ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन
संदेश पारकर यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती
मिरवणुकीत महीलांचीही उपस्थिती लक्षणीय
सालाबादप्रमाणे कणकवली बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. शिवसेना नेते तथा बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बाजारपेठ मित्र मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.आकर्षक मंडप व देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली पटवर्धन चौक येथून ते बाजारपेठ पर्यंत भव्य दिव्य स्वरूपात नवरात्रोत्सव स्थळापर्यंत काढण्यात आली. यात शहरवासिय व महीलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी,ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकित संदेश पारकर यांच्यासह बाजारपेठ मित्र मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आजपासून गुरुवार ६ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा,आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी सतिश सावंत, रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, सुशांत नाईक, अँड.हर्षद गावडे, कन्हैया पारकर, दिपक बेलवलकर, सतिश मसुरकर, राजन पारकर, राजू वाळके, अवधुत मालनकर, महानंद चव्हाण, विलास गुडेकर, समृद्धी पारकर, निलम सावंत, शितल पारकर, प्रतिक्षा साटम, पुनम म्हापसेकर, अश्विनी मोरये, अल्फा पारकर, श्वेता शिरसाट, माधुरी कोदे, सानिका कोदे, प्रिया सरुडकर, दिव्या साळगावकर, रेश्मा शिरसाट, सौरभी मोरये, दिशा काणेकर, आदित्य सापळे, सोहम वाळके, सिद्धेश खटावकर, बाबु केनी, समीर सावंत, सर्वेश शिरसाट, ऋषी वाळके, ओंकार पारकर, समीर पारकर, तन्मय नार्वेकर, सागर चव्हान, आकाश कोदे, संकेत शिरसाट, आदित्य म्हापसेकर, अक्षय भोगटे, रोहीत म्हापसेकर, तेजस काणेकर, अंकित मसुरकर आदी उपस्थित होते.