You are currently viewing प्रथम राष्ट्रसेवा या भावनेतून कार्यरत व्हा..!

प्रथम राष्ट्रसेवा या भावनेतून कार्यरत व्हा..!

उत्तर भारत भाजपा मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते अमित त्रिपाठी यांचे आवाहन

अन्य राज्यातील कुटुंबाच्या प्रतिनिधी सोबत कणकवलीत झाली सभा

कणकवली

पूर्वाचल, उत्तरांचल मध्ये ज्या पद्धतीने योगी सरकार आल्यानंतर गुंडशाही संपून शांतता प्रस्थापित झाली आहे त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा येत्या काळात सुख आणि शांतता निर्माण होईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशात समृद्धी आणि शांती प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. या कामात आपण ज्या ज्या प्रांतात असाल आणि देशात जेथे काम करत असता तेथे प्रथम राष्ट्रसेवा या भावनेतून कार्यरत व्हा..! असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारत भाजपा मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते अमित त्रिपाठी यांनी केले. ते कणकवली येथे एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात अन्य राज्यातील,व्यापारी,दुकानदार,कारागीर,कामगार कुटुंबियांच्या प्रतिनिधीच्या कणकवली प्रहार भवन येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक भाजपा आमदार नितेश राणे उपस्थित होते.


सरदार वल्लभाई ची अखंड भरत ची कल्पना होती.हीच हीच संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर राबवली आहे.भारत हा असा देश आहे जो विश्वाला शांतीचा संदेश देतो. सर्वांचा सहभाग आणि सर्वांचा विकास हा प्रमुख मुद्दा घेऊन ते देशभर काम करत आहेत कणकवली गावचे सुपुत्र असलेले केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे त्यांच्यासोबत देशात काम करत असताना आपण कणकवलीतले म्हणून अभिमान बाळगला पाहिजे.तर कणकवलीत आमदार नितेश राणे अन्य राज्यातून आणलेल्या कुटुंबीयांना सातत्याने मदत करतात त्यांच्यासोबत वावरतात त्यांच्या अडचणी सोडवतात अशा नेतृत्वावर विश्वास ठेवून कायम राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.तर कोणत्याही प्रांतातून कणकवली विभागात आलेले असाल तर या विभागाप्रती तुमचे असलेले प्रेम जसे व्यक्त करता तसेच कृतीतूनही व्यक्त व्हा.असेही ते म्हणाले.
ते म्हणाले,पूर्वाचल, उत्तरांचल मध्ये खूप गुंडगिरी सुरू होती. आता योगी सरकारच्या काळात शांतता आली आहे. ही परिस्थिती बिहार मध्ये आणायची आहे.. देशाने मोदी ना स्वीकारले आपणही त्यांना साथ दिली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आम्ही राहतो या ठिकाणचा समुद्र आणि त्यावर आरमाराची संकल्पना छत्रपती शिवाजी राजांनी सर्वप्रथम मांडली आणि नौदल सुरू केले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपतींच्या आरमाराची प्रेरणा घेऊन काम करत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा