अन्य राज्यातील कुटुंब प्रमुखांना आमदार राणे यांनी दिला विश्वास
“एक भारत श्रेष्ठ भारत” या उपक्रमांतर्गत कणकवली झाला भव्य मेळावा
गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, राजस्थान बिहार, केरळ, कर्नाटक या भागातील प्रतिनिधींचा उस्फूर्त सहभाग
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भाजपचा उपक्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात अन्य राज्यातून आलेल्या व्यापारी,कारागीर,कामगार, मजूर अशा अनेक कुटुंबांचा हातभार आहे. आम्ही सिंधुदुर्ग वासियांनी सुद्धा तुम्हा सर्वांना स्वीकारलेले आहे. तुमच्याअडचणी सोडविण्यासाठी आम्ही आहोत.आज पर्यंत जसा तुम्हाला मदतीचा हात दिला तसाच भविष्यातही सहकार्याची देवाणघेवाण कायम राहील. राणे कुटुंब हे तुमच्या हक्काचे आहे. कधीही हाक द्या सेवेसाठी तत्पर असणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या निमित्ताने “एक भारत श्रेष्ठ भारत”या उपक्रमांतर्गत गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, राजस्थान बिहार, केरळ, कर्नाटक या भागातील कणकवलीत राहणाऱ्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधी समवेत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उत्तर भारत भाजपा मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते अमित त्रिपाठी, सदस्य ओमप्रकाश तिवारी, पटेल समाजाचे अध्यक्ष कांतीलाल पटेल, मतदार संघाचे समन्वयक मनोज रावराणे, कणकवली तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष संतोष कानडे, शहरमंडल तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी सभापती दिलीप तळेकर युवक मोर्चाचे गणेश तळगावकर आदी मान्यवर व्यापिठवर उपस्थित होते.ही सभा कणकवली ते कणकवली प्रहार भवन येथे झाली यावेळी मोठ्या संख्येने अन्य राज्यातील समाज बांधव उपस्थित होते.
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाची घरात देवपूजा असताना सुद्धा माझा एक निरोपावर आपण येवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्या बद्दल मी तुमचे प्रथमता ऋण व्यक्त करतो असे सांगत आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले ही आपल्या नात्याची खरी ताकद आहे.कणकवली मतदार संघात जो विश्वास राणे कुटुंब आणि भाजपावर तुम्ही दाखवला त्यातून काम करण्यासाठी मला आणखीन ऊर्जा मिळते. मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपला आणि परका असा दुजाभाव कधीच केला नाही.आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकतेची सर्वांना सोबत घेवून चालण्याची शिकवण दिली. तुम्ही आमच्या राणे कुटुंबातील सदस्य आहात असे मानून आम्ही काम करतो. सुखदुःखात जेव्हा हाक द्याल तेव्हा आम्ही धावून येतो. मदत करताना तुम्ही माझे मतदार म्हणून करत नाही तर मी तुमच्या मुला समान, भाऊ,नातू म्हणून काम करतो. भाजपा हा आमचा पक्ष त्यात तुम्ही आमच्या सोबात काम करत आहात.ही जोड अशीच कायम ठेवूया असे आवाहन केले.
आपल्या आपल्या कणकवली देवगड वैभववाडी प्रतिनि तालुक्यात देशाच्या उत्तर दक्षिण,भागातून तसेच गुजरात केरळ कर्नाटक राजस्थान बिहार उत्तर प्रदेश या भागातून व्यवसाय निमित्ताने अनेक कुटुंब आलेले आहेत या कुटुंबांना सुख सुविधा मिळाव्यात त्यांच्या माध्यमातूनही जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून माझे प्रयत्न कायम सुरू आहेत तुम्हाला ज्या अडचणी असतील त्यांनी संकोचपणे माझ्याकडे मांडा असे आवाहनही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.
गुजराती समाजाचे अध्यक्ष कांतीलाल पटेल म्हणालेत राणी कुटुंबियांसमवेत व त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आणि गेले कित्येक वर्ष बांधले गेलेलो आहोत राजकारणापलीकडच्या आमचे संबंध या कुटुंबाचे आहेत जेव्हा गरज भासेल आणि प्रसंग येईल तेव्हा तेव्हा त्याने कुटुंबाने आम्हाला सहकार्य केले आहे आमचेही त्यांच्याशी असलेले स्नेहाचे नाते कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
कणकवली येथील चिमणलाल पटेल यांनी रेल्वे सेवा कणकवली तालुक्याला अधिकतम जोडली जावी गुजरात उत्तर प्रदेश बिहार केरळ कर्नाटक मध्ये जाणाऱ्या गाड्या कणकवली मध्ये सेंटर असून सुद्धा काही थांबत नाहीत वास्को पटना, हाप्पा, वाराणसी अशा गाड्या कणकवलीत थांबल्यास आम्हाला गावाकडून ये जा करणे सोयीचे होईल अशी मागणी यावेळी त्यांनी केली.