बांदा
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत न्हावेली – देऊळवाडी येथे आंबा पुनर्जीवन, आंबा पीक किड व रोग या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमास ग्रामस्थ शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
शेतकऱ्यांना सहाय्यक प्राध्यापक आंबा विभाग, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, डॉ. एम.पी. कणसे यांनी आंबा पुनरुजीवन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर कार्यक्रमासाठी न्हावेली गावच्या सरपंच प्रतिभा गावडे, उपसरपंच विठोबा गावडे, मंडळ कृषी अधिकारी व्ही.एस.वाघमारे, कृषी पर्यवेक्षक प्रिया सावंत, कृषी सहाय्यक प्रिया पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य शरद धाऊसकर, भावना धाऊसकर, चैताली दाभोलकर, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभवचे विद्यार्थी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कृषी सहाय्यक के.एम.देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कृषी पर्यवेक्षक प्रिया सावंत यांनी आभार मानले.