जिओ मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आम.नितेश राणे यांची भेट..
ग्रामीण स्थरावर टॉवर उभेकरण्या संदर्भात सकारात्मक चर्चा….
कणकवली :
कणकवली-देवगड-वैभववाडी या तिन्ही तालुक्यात जिओ मोबाईल नेटवर्क चे जाळे विणले जाणार आहे.त्यासाठी जिओ मोबाईल कंपनीचे सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्ह्याचे सेंटर म्यानेजर नितीन चौगुले यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा केली.
कणकवली विधानसभा मतदार संघात देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भाग मोबाईल नेटवर्कने जोडला जावा यासाठी आमदार नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आज जिओ मोबाईल च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आमदार श्री.राणे यांनी ग्रामीण भागात मोबाईल टॉवर नसल्याने मोबाईला रेंज नाही.त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी या वरही चर्चा केली.मोबाईल हे संपर्काचे प्रमुख माध्यम आहे.त्याची जनतेला असलेली गरज लक्षात घेऊन आमदार नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिओच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे कणकवली विधानसभा मतदार संघात जास्तीत जात टॉवर उभे करून नेटवर्कचे जाळे विणले जाणार आहे.