You are currently viewing पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध पर्यटन मंत्री मा.श्री.मंगल प्रभात लोंढाजी याचे पर्यटन महासंघास अभिवचन

पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध पर्यटन मंत्री मा.श्री.मंगल प्रभात लोंढाजी याचे पर्यटन महासंघास अभिवचन

*सिवल्ड प्रोजेक्ट उभारणीसाठी राज्य सरकार सकारात्मक : श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.*

 

कोकण च्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांची मा.भाजपा मुख्य प्रवक्ते श्री .माधवजी भंडारी साहेब यांच्या माध्यमातून भेट घेण्यात आली मा .पर्यटन मंत्री महोदय यांनी कोकणाच्या शाश्वत नियोजन साठी मा.माधवराव भंडारी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पर्यटन महासंघाने काम करण्याचे सूचित केले. पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघा तर्फे व्यापार व पर्यटन वाढीसाठी राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती मंत्री महोदय यांना देण्यात आली कोरोना नंतर कोकणात पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा कोकणातील व्यावसायिक करत असताना पर्यटन व्यवसाय वाढीसाठी राज्य सरकारने व्यावसायिकांच्या मदतीसाठी एक आश्वासक पाऊल उचलण्याची गरज असल्याची भूमिका महासंघाने व्यक्त केली आज कोकण प्रांतात बीच टुरिझम सोबत अँग्रो ,कल्चर,मेडिकल,फूड,हिस्ट्री क्षेत्रात काम होणे गरजेचे असून पर्यटन खात्यामार्फत न्याहरी निवास धारक ,हॉटेल,व्यापारी वर्गासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे कोकण आंतराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी काही ग्लोबल प्रोजेक्ट ची आवश्यक्यता आहे अशी विनंती महासंघा तर्फे करण्यात आली त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित सिवल्ड प्रकल्प होण्याविषयी मंत्री महोदया सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली त्यावेळी मंत्री महोदयांनी स्थानिक जमीन मालक प्रकल्पासाठी सकारात्मक असतील तर मार्ग निच्छित निघेल असे आश्वासन दिले यावेळी कोकणातल्या पर्यटन वाढीसाठी आवश्यक मागण्याचे निवेदन मंत्री महोदय यांना देण्यात आले .लवकरच कोकणातील पर्यटन समस्या जाणून घेण्यासाठी कोकण दोऱ्यावर यायचे त्यांनी मान्य केले तसेच कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री महोदय यांनी स्पष्ट केले.यावेळी मा.भाजपा मुख्य प्रवक्ते श्री माधवजी भंडारी साहेब हे उपस्थित होते अशी माहिती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा