दशावतार सुरू होण्यासाठी आमदार राणेचा सुरू आहे पाठपुरावा…
कलाकारांनी मानले आभार,कलाकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर केली चर्चा….
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली.दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी शासनाने परवानगी घ्यावी यासाठी आमदार नितेश राणे राज्यसरकारकडे पाठपुरावा करत असल्याबद्दल आभार मानले.ही भेट दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशिय संघ सिंधुदुर्गचे पदाधिकारी, कलाकार यांनी घेतली.
यावेळी अध्यक्ष तुषार नाईक,सचिव सचिन पालव,नाथा नालंग-परब,सुधीर कलिंगन, पुरुषोत्तम खेडेकर,बाबा मेस्त्री मारुती सावंत,आदी सह अनेक दशावतारी कलाकार उपस्थित होते.
आमदार नितेश राणे हे दशावतार कलाकारांचे प्रश्न राज्यसरकार कडे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही कोकणची लोककला चालू केली जावी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन हजार कलाकारांची कुटुंबे या दशावतारी नाट्य कलेवर अवलंबुन आहेत.त्यांच्या उपजीविकेचे साधन ही कला आहे.कोकणची संस्कृती असलेला दशावतार सादर करण्याची परवानगी घ्यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी करून राज्यसरकारचे लक्ष वेधले आहे.त्याबद्दल दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशिय संघ ने आभार मानून कलाकारांच्या इतर प्रश्नावरसुद्धा चर्चा केली .