You are currently viewing अमली पदार्थ मटका,जुगार अनधिकृत धंदे बंद करा

अमली पदार्थ मटका,जुगार अनधिकृत धंदे बंद करा

मनसेकडून उपविभागीय अधिकारी सावंतवाडी पोलीस ठाणे यांना निवेदन सादर

सावंतवाडी तालुक्यात व शहरात गेले काही दिवस जुगार व मटक्याचे अड्डे राजवसपणे सुरू आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे अशा तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांकडून आमच्याकडे केल्या आहेत त्यामुळे या अड्ड्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसेतर्फे आक्रमक भूमिका घेणार आहोत.
सद्यस्थितीत शहरात अनेक ठिकाणी नाक्या नाक्यावर मटका बुकिंगची संख्या वाढली आहे राजरोसपणे त्या ठिकाणी जाऊन शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी पैसे खर्च करताना दिसत आहेत.अंमली पदार्थ आणी दारूच्या आहारी गेल्याने अनैतिक प्रकार व आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवावा.
दोन दिवसांपूर्वी मळगाव येथे जुगार अड्डा सुरू अशी बातमी सोशल मीडियावर फिरत होती याकडे स्थानिक पोलिसांनी काय भूमिका घेतली याचे उत्तर द्यावे.
नवनिर्वाचित पोलीस अधिकारी फुलचंद मेंगडे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील काही दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना चाप बसला आहे ही कौतुकाची गोष्ट आहे यापुढेही त्यांनी असेच कारवाई सातत्य ठेवावे आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गोवा बनावट चोरटी दारू वाहतूक, जुगार व मटका तसेच अड्ड्यावर कडक कारवाई करून सदरचे अवैद्य धंद्ये समुळ नष्ट करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत आपल्या कार्यालयावर सर्व सावंतवाडीकर जेष्ठ नागरिक व महिलांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल .यासाठी आम्ही सावंतवाडी मनसेतर्फे हे निवेदन देत आहोत.

यावेळी माजी आमदार तथा मनसे नेते परशुराम उपरकर,  शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री संतोष भैरवकर कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मंदार नाईक कुणाल किनळेकर बाबल गावडे दीपक गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत कौस्तुभ नाईक सुरेंद्र कोठावळे प्रवीण गवस आबा चीपकर मनोज कांबळी विष्णू वस्कर वैभव धुरी मंदार सुभेदार आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा