दिवसातून दोन वेळा देणार सेवा; सावंतवाडीतील युवकांनी केली मागणी…
सावंतवाडी
उपजिल्हा रुग्णालयात फिजीशीअन अभावी होणारे रूग्णांचे वाढते मृत्यू व रुग्णालयात न मिळणारे उपचार लक्षात घेता सावंतवाडीतील शिष्टमंडळाने डॉ. अभिजीत चितारी यांची भेट घेतली. यावेळी एनआरएचएम मधून पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त होईपर्यंत दिवसांतून दोन वेळा सकाळी व रात्री मोफत रूग्णसेवा देणार असल्याची माहिती डॉ. अभिजीत चितारी यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले हृदयरोगतज्ञ डॉ. अभिजित चितारी यांनी एक महिन्यांपूर्वी कोलगाव येथे स्वतःचे रुग्णालय चालू केल्यामुळे राजीनामा दिला. त्यानंतर त्या जागी कोणाचीही नेमणुक झाली नाही. संबंधित जागा रिक्त असल्यामुळे बऱ्याच गोरगरीब रुग्णांना त्यांचा फटका बसला. त्यामुळे आम्ही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांची ओरोस येथे झालेली बदली रद्द करुन पुन्हा सावंतवाडी येथे हजर केले. ६ वर्षापूर्वी सुद्धा डॉ. दुर्भाटकर यांची झालेली बदली केसरकर यांनी रद्द केली. त्याचप्रमाणे दुसरे हृदयरोगतज्ञ डॉक्टर येईपर्यंत डॉ. अभिजित चितारी यांना एनआरएचएम मधून पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणावे अशी विनंती केली. व केसरकर यांनी ते मान्यही केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील हे नेहमीच सकारात्मक असतात. त्यांनी यापूर्वीही आमची बरीचशी कामे मार्गी लावली. त्यांनाही आम्ही विनंती करुन डॉ. अभिजित चितारी यांना पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणावे अशी विनंती केली. त्याबाबत तेही सकारात्मक आहे. म्हणून आम्ही प्रथम डॉ. अभिजित चितारी यांनाही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी पुन्हा एनआरएचएम मधून सेवा द्या अशी विनंती केली. त्याला डॉ. चितारी यांनीही होकार दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुढील काम डॉ. श्रीधर पाटील व मंत्री महोदयांनी पुढील काम करावे अशी विनंती आहे. यावेळी दिवसातून दोन वेळा रूग्णांना सेवा देणार असल्याची माहिती दिली. आयुर्वेदिक व होमिओपॅथी कॉलेजचे शिकावू ४ विद्यार्थ्यांची नेमणूक करून आपल्या मार्गदर्शनाखाली टीम कार्यरत करण्यात यावी, या टीमच्या माध्यमातून २ वेळा सकाळी व रात्री सेवा देणार अशी माहिती डॉ. चितारी यांनी दिली. तर तोवर मोफत रूग्णसेवा देणार असल्याची माहिती डॉ. चितारी यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर, ज्येष्ठ उद्योजक अशोक गुप्ता, माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, कारिवडे माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गावकर, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण देऊलकर, सत्यवान नाईक, अचिर्त पोकळे, अनिकेत पाटणकर, नारायण कारिवडेकर, साईश निर्गुण, वैभव दळवी, गौतम माटेकर, मेहर पडते, पांडूरंग जाधव, अक्षय देशपांडे, राघवेंद्र चितारी, सुरज मठकर उपस्थित होते.