*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*
*…. नवरात्रीच्या पूर्वीसंधेला….*
मी दुर्गा….
खरच असं आहे का ?? .. खरेखुरे ८ हात नसले तरीही त्यापेक्षा जास्त काम करण्याची ताकद दुर्गेत आहे हे अनेकदा अनुभवतो..
टीव्हीवरील मालिका नक्की काय दाखवत आहेत.. स्त्रीच्या जीभेवरच फक्त काळा तीळ असतो का ?? .. पुरुषांच्या नसतो ?? .. ती जे बोलते तेच होतं का ?? मग ती तर चांगलही बोलते मग त्यावरही विचार व्हायलाच हवा ना.. किवा काही स्त्री पुरुषांकडे अशी विद्या उपजतच असते की त्यांना घडणाऱ्या घटना आधीच कळतात याला आपण काय म्हणायचं??
देवीच्या पवित्र गोंधळात मुलीने संबळ वाजवु नये हे वाक्य नक्की काय सांगतं ?? .. त्यावर त्या मुलीला सांगावं लागतं की ती देवीही स्त्रीच होती..
९ दिवस आपण देवीचा उत्सव साजरा करणार आहोत.. आपण स्त्रीचा आदर करायला हवा असं बोलतो मग टीव्हीवरील मालिका आपल्याला काय सांगत आहेत.. नवरात्रीच्या पुर्वसंधेला आपण खरच देवी आहोत का ??
मी कशी असायला हवी?? ..
मनाने स्वच्छ पवित्र असायला हवी..
शेजारणीने गाडी किवा नेकलेस घेतला तर माझ्या पोटात दुखायला नकोय म्हणजेच दुसऱ्याचं सुख पचवण्याची ताकद माझ्यात असायला हवी..
… माझ्यात गर्व नको पण स्वाभिमान हवा..
… माझे विचात प्रगल्भ असायला हवेत…
…मी बोल्ड आणि कल्चर्ड हवी..
… उत्तम मनासोबत माझं शरीरही उत्तम हवं त्यामुळे मी व्यायाम आणि योग्य आहार यांची सांगड घालता यायला हवी…
एकूणच काय तर आठ हातामधुन अनेक चांगली कामे दुसऱ्यासाठी करेन..
खरच मी दुर्गा आहे का ??
नसेल तर बदल करेन आणि उत्तम माणुस म्हणुन सन्मानाने ,,सद्विचाराने जगेन ..
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*