You are currently viewing नवरात्रोत्सव – नवरंग : वर्ष २०२२

नवरात्रोत्सव – नवरंग : वर्ष २०२२

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*”मेघनुश्री” या टोपण नावाने लिहिणाऱ्या कोल्हापूर येथील लेखिका कवयित्री श्रीमती मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*नवरात्रोत्सव – नवरंग : वर्ष २०२२*

सरलेला पावसाळा आणि थंडीच्या आगमनाची लागलेली चाहूल अशा संपन्न वातावरणामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची सुरवात होते. सर्व देवींच्या रूपाची एकरूपता साकार होते, “क्षेत्र नामवंत एक नांव त्याचे कोल्हापूर, अगणित खांबावर उभे राहिले मंदिर.” या भक्तीगीताच्या ओळीने मन व्यापून जाते. आदिशक्तीचे नऊ दिवसांत, नऊ रूपांत होत असलेले पूजन आणि हा उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान असे म्हणावे लागेल. अनेक कलाकार आवर्जून देवीच्या चरणी गायन, भजनांतून आपली कला मंदिर परिसरांत सादर करत असतात. लोककलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवत असतात. गेल्या काही वर्षांपासून या नवरात्रामध्ये नवरंगांनाही महत्व आले आहे. वेगवेगळी वैशिष्ट्य असणारे, निसर्गाशी समरस होणारे हे रंग असे आहेत.
श्री] घटस्थापना [अश्विन शुक्ल प्रारंभ] – सोमवार दिनांक २६ सप्टेंबर : पांढरा रंग – शांतता आणि सात्विकतेचे प्रतिक आहे. इतर रंगांना समाविष्ट करून घेणारा आणि वेगळा रंग तयार करणारा असा आहे. विशेषतः स्वतःचे अस्तित्व टिकवत सामावून जाण्याची किंवा घेण्याची शिकवण तो देत असतो.
क] आश्विन शुक्ल द्वितीया – मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर : लाल रंग – रक्तरंजितता दर्शविणारा, भडकतेचे समर्थन करणारा, कुंकवाचा हा रंग आराध्य दैवत श्री गणेशांचा अत्यंत आवडता आहे. काही फुलांनाही हा रक्तवर्णीय रंग लाभला आहे. परिवर्तनाचा ध्यास घेणारा हे याचे अनोखेपण आहे.
र] आश्विन शुक्ल तृतीया – बुधवार दिनांक २८ सप्टेंबर : निळा रंग – नेत्रसुखद, निरभ्र आकाशाचा हा रंग मनाला दिलासाही देतो. गडद निळा, फिकट निळा ज्याचा उल्लेखच आकाशी रंग असा केला जातो त्याशिवाय निळ्या रंगाची काळपट छटा म्हणजे जो काळपट निळा म्हणून ओळखला जातो असेही या रंगाचे प्रकार आहेत.
वी] आश्विन शुक्ल चतुर्थी – गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर : पिवळा रंग – एक आल्हाददायक पण तरीही परिपक्वतेची जाणीव करून देणारा, अनुभवाने समृद्ध, हा रंग ‘हळदी’ या नावांनेही ओळखला जातो. आरोग्य, वर्ण याच्याशी या रंगाचा संबंध निकटचा समजला जातो. या दिवसाला विनायक चतुर्थी असेही संबोधण्यात येते.
र] आश्विन शुक्ल पंचमी – शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर : हिरवा रंग – या रंगातून नैसर्गिक समृद्धी प्रकट होते. शुभकार्यात या रंगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. स्त्री दैवतांच्या ओटी साहित्यात बांगडी आणि खणाच्या रूपाने हा रंग विराजमान असतो. हा दिवस सरस्वती आवाहन दिन म्हणून साजरा केला जातो. याला ललिता पंचमी असेही म्हटले जाते. देवीदेवतांच्या भेटीचे सोहळे या दिवशी अनेक ठिकाणी पहायला मिळतात.
नि] आश्विन शुक्ल षष्ठी – शनिवार दिनांक ०१ ऑक्टोबर : भुरा रंग – या रंगाचे वेगवेगळ्या छटेत वर्णन करता येईल ते असे करडा, राखाडी, पांढुरका इत्यादी. या रंगाचा ढग पर्जन्याचा इशारा देतो. पाणी हे जीवन असे यांतून प्रतीत होते. घटस्थापनेदिवशी जर पावसाने हजेरी लावली तर तो ‘माळेत अडकला’ असे सांगितले जाते म्हणजे नऊ दिवस पाऊस पडत रहाणार अशीही धारणा आहे. या दिवशी सरस्वती पूजन केले जाते.
वा] आश्विन शुक्ल सप्तमी – रविवार दिनांक ०२ ऑक्टोबर : नारंगी रंग – केशरी रंगाच्या जवळचा, अंधार/ तिमिराला पोटात घेऊन, सूर्यदेवाच्या आगमनावेळी पूर्व क्षितिजावर प्रकटणारा किंवा त्यांच्या प्रथम किरणांत सामावणारा सतत उर्जा देणारा असा. जीवन प्रकाशमान करणारा, उजळून टाकणारा.
सि] आश्विन शुक्ल अष्टमी – सोमवार दिनांक ०३ ऑक्टोबर : पोपटी रंग – निसर्गानेच एका पक्षीवर्गाला बहाल केलेला, हिरवाईची सूक्ष्म छटा जाणवणारा, गर्द वनराईतून नजरेस वेगळा दिसणारा. नवरात्रीतील हा सर्वांत महत्वाचा दिवस. या दिवशी महालक्ष्मीचे विशेष पूजन करतात, घागरी फुंकून फेर धरून देवीची सेवा करण्याची वेगळी प्रथा पहायला मिळते. हा दिवस काही ठिकाणी ‘दुर्गाष्टमी’ या नावांनेही ओळखला जातो.
नी] आश्विन शुक्ल नवमी – मंगळवार दिनांक ०४ ऑक्टोबर : गुलाबी रंग – हा रंग म्हणजे यशाचे, विजयाचे प्रतिक आहे. सदैव टवटवीतपणा ज्याला निसर्गतःच मिळाला आहे. या दिवसाचे महत्वही वेगळेच आहे ‘खंडेनवमी’ असा याचा उल्लेख येतो. वर्षभर घरकामांत साथ देणाऱ्या शस्त्रास्त्रांचे, मशिनरीचे तसेच शालेय साहित्याचे पूजनही याच दिवशी केले जाते.
विजयादशमी [दसरा] – बुधवार दिनांक ०५ ऑक्टोबर – नवरात्रोत्सव, नवरात्रोत्थापनाचा दिवस विजयमुहूर्त-विजयादशमी या नावांने ओळखला जातो. गेले नऊ दिवस आपण वेगवेगळ्या रंगांचे महत्व आणि वैशिष्ट्य जाणून घेतले. जीवनांतही असेच अनेक रंगांनी समृद्धी यावी ही महालक्ष्मीचरणी प्रार्थना करून उत्सवाची सांगता करू या.

मेघनुश्री, कोल्हापूर
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२
ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा