You are currently viewing पहिली माळ…

पहिली माळ…

शैलपुत्री देवी

वंदे वांच्छितलाभा्य चंद्रार्धकृत शेखराम l वृषा रुढा शुलधरा शैलपुत्री यशस्वीनींम ll

भगवती दुर्गामाता आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री यां नावाने ओळखली जाते. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून हिला शैलपुत्री म्हणतात. वृषभा रुढ अशा यां मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. नवदुर्गा मध्ये प्रथम असलेल्या या शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि महात्म्य अगाध आहे. हिच्या अनंत शक्ती आहेत. नवरात्रात पहिल्या दिवशी हिचीच पूजा आणि उपासना केली जाते. पहिल्या दिवसाच्या उपासनेत योगी आपल्या मनाला मुलाधार ‘ चक्रात स्थित करतात. येथूनच त्यांच्या योगसाधनेंस प्रारंभ होतो.

आजचा रंग.. पांढरा

माळ.. विड्याच्या पानाची माळ

कल्पना तेंडुलकर.

ओरोस.

प्रतिक्रिया व्यक्त करा