सिंधुदुर्गनगरी:
बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या कायद्यानुसार शाळा मान्यतेसाठी 1 ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळांनी दिनांक 30 ऑक्टोबर 2020 पूर्वी अर्ज सादर करावेत असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.
शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने स्थापन केलेल्या शाळेव्यतिरिक्त सर्व शाळांना आरटीई शाळा मान्यता घेणे आवश्यक आहे. तसेच शाळेस मान्यता घेतली नसल्यास म्हणजेच मान्यतेशिवाय शाळा सुरू असल्यास आरटीई ॲक्ट 2009 मधील कलम 18(5) नुसार द्रव्यदंडाची शिक्षा आणि शाळेला कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागेल. तरी शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने स्थापन केलेल्या शाळांव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व शाळांनी आरटीई ॲक्ट मधईल नमुना – 1 शाळा मान्यतेसाठी स्व-प्रतिज्ञापत्र व अर्ज या नमुन्यात शाळा मान्यतेसाठीचे अर्ज गटशिक्षणाधिकारी स्तरावर सादर करावेत असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.