बांदा
दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस रस्त्याच्या बाजूने केबल खोदाईचे धोकादायक पध्दतीने काम सुरू आहे. खोदाईची माती रस्त्यावर आली असून शनिवारी सकाळी दुचाकीस्वाराचा अपघात घडला. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खोदाई करण्यात आलेली साईडपट्टी निर्धोक करावी तसेच रस्त्यावर आलेली माती तात्काळ हटवावी अन्यथा काम रोखणार असल्याचा इशारा युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी दिला आहे.
पावसाळ्यात केबल खोदाईसाठी प्रशासनाने परवानगी देऊन अपघातास निमंत्रणच दिले आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे खोदाई केलेली माती रस्त्यावर आली आहे. परिणामी दुचाकीचा अपघात झाला. यापूर्वी पाईपलाईनसाठी खोदाई त्यानंतर केबल खोदाई करण्यास परवानगी देऊन धोका निर्माण झाला आहे. आतातर पावसाळ्यात पुन्हा एकदा काम सुरू असल्याने प्रशासनच बेफिकीर बनले काय असा सवाल समीर नाईक यांनी उपस्थित केला आहे.
दोन वाहनांना बाजू देताना अनेक वाहने कलांडुन अपघात झाल्याच्या घटना परिसरात घडल्या. याचा चारही बाजूने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदाई केलेली साईडपट्टी अगोदर निर्धोक करावी व रस्त्यावर आलेली माती हटवावी. अन्यथा प्रवासी, वाहनचालक, तसेच ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीनुसार आम्हाला नाईलाजास्तव काम रोख
खावे लागणार असल्याचा इशारा श्री. नाईक यांनी दिला.