You are currently viewing काँग्रेसची कुडाळ येथे बैठक संपन्न

काँग्रेसची कुडाळ येथे बैठक संपन्न

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक खासदार पद्मश्री कुमार केतकर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु अर्थतज्ज्ञ मा.खासदार डाॅ.भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटने बाबत चर्चा करण्यात आली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद हा राजकीय बदलाची नांदी आहे. आता लोकाना कळून चुकले आहे की काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही असे प्रतिपादन खासदार कुमार केतकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी प्रदेश पातळीवरून जिल्हा काँग्रेसला बळ दिले जाईल असे आश्वासन मा. खासदार डाॅ.भालचंद्र मुणगेकर यानी दिले. डाॅ.मयूर शारबिद्रे यांना माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते देऊन त्यांच्या या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.


यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, माजी अध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम,प्रकाश जैतापकर,जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये,विजय प्रभू, सरचिटणीस चंद्रशेखर जोशी,कुडाळ मालवण विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर, मिडीया विभाग जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरुणकर,ओबीसी विभाग महाराष्ट्र सचिव अमिदी मेस्त्री,कुडाळ नगराध्यक्ष आफ्रिन करोल, महिला बालकल्याण सभापती अक्षता खटावकर, जिल्हा बॅंक संचालक तथा मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी,कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सचिव रविंद्र म्हापसेकर, सुभाष दळवी,आनंद परूळेकर,संदेश कोयंडे,रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष सुंदरवल्ली पडीयाची, माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विभाग जिल्हाध्यक्ष डॉ. मयूर शारबिद्रे,जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, काळसेकर मॅडम,उमेश कुलकर्णी, भाबल,संदिप सुकी,सुधीर मल्हार, दिलीप रावराणे,अभय मालवणकर, तबरेज शेख, तौसीफ शेख, शाहिन शेख, अस्लम खतीब, सिद्धेश कदम,सुरज घाडी,गोविंद कुंभार,सदाशिव आळवे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा