बोरिवली येथील श्री हरी एज्युकेशनल ट्रस्ट च्या सेंट रॉक विधी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल 24 सप्टेंबर रोजी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे नेण्यात आली.
मुख्याध्यापिका ॲड.श्वेताली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड प्रफुल साळवी ,ॲड. मनीषा पाठक, ॲड. वैभवी पवार
ॲड. नितीन साळवी या प्राध्यापकांनी सहल यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
इमाम अब्दुल रेहमान यांनी सन १९३५ पर्यंत ‘सराई का दरोगा’ म्हणून त्या सराईची काळजी घेतली. नंतर ब्रिटिशकाळात या सराईच्या काही भागाचे रूपांतर जेलमध्ये करण्यात आले. सन १९३६ साली ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सत्याग्रहींना येथेच डांबून ठेवले होते. नंतरच्या काळात या जेलमध्ये निजामाने मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अटक करून येथेच ठेवले होते.
राज्यातील 9 मध्यवर्ती कारागृहांपैकी एक आहे आणि राज्यातील 5 सर्वात महत्त्वाच्या मध्यवर्ती कारागृहांपैकी एक आहे
गळाभेट, फोन कॉलिंग, शिक्षण, आरोग्य , कुशल कारागिरांना काम, चांगले जीवन आदी सुविधांमुळे कैद्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होत आहे. विधी महाविद्यालयाच्या सर्व भविष्यकालीन वकील विद्यार्थ्यांनी कारागृहाचे अंतर्गत व्यवस्थापन पाहिले व ते अत्यंत रोमांचित झाले .
सर्व भेटी नंतर औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह अधिक्षका अरुणा मुगुटराव आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश हिरेकर, हर्षद सय्यद ,रवींद्र आवताडे यांचे त्यांच्या शासकीय कार्यालयात प्रिन्सिपल श्वेताली पाटील यांनी शाल फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले व धन्यवाद दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता व त्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या धनंजय जुन्नरकर यांनी सदर कारागृह भेटीसाठी परवानगी मिळावी म्हणून विशेष प्रयत्न केले होते.
सेंट रॉक विधी महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल श्वेताली पाटील , अरुणा मुगुटराव,अधीक्षका औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह ह्यांचे स्वागत करत आहे. फोटोत प्रो.मनीषा पाठक, प्रो. वैभवी पवार दिसत असून डाव्या बाजूला प्रो. प्रफुल साळवी, धनंजय जुन्नरकर महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता, व प्रो नितीन साळवी, करण शिंदे हे देखील दिसत आहे.