You are currently viewing वाफोली गणेश मंदिर येथे भाजपा बांदा मंडलच्या वतीने लाक्षणिक उपोषण…..

वाफोली गणेश मंदिर येथे भाजपा बांदा मंडलच्या वतीने लाक्षणिक उपोषण…..

मंदिर बंद या सरकारच्या काळ्या निर्णयाचा विरोधात घोषणा

बांदा
मंदिर बंद, उघडले दार, उद्धवा धुंद तुझे सरकार… अशा घोषणा देत राज्य सरकारच्या मंदिर बंद आणि दारू बार उघडी या काळ्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र च्या वतीने सर्व मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण पुकारले आहे .. याचाच भाग म्हणून गावोगावी असणाऱ्या मंदिरात राज्य सरकारला जागे करण्यासाठी मंदिरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने भजने करण्यात येत आहेत. मंगळवारी सकाळी १०: ३० वाजता सावंतवाडी तालुका भाजप बांदा मंडल चे अध्यक्ष महेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली बांदा वाफोली गणेश मंदिर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी भाजपा चे प्रवीण पंडित, जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रा. सदस्य उमांगी मयेकर, सोनू मुकुंद कासकर, नंदकिशोर गनू कासकर, विश्वनाथ शांताराम राणे, अरुण दामोदर कुडके, विजय गावडे, किसान मोर्चा जिल्हा सदस्य हेमंत दाभोलकर, अजित गवस, विनेश गवस व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दुपारी दोन वाजेपर्यंत भजनही करण्यात आले.
या उपोषणाचा आगळावेगळेपणा म्हणजे देवाचे नामस्मरण करत भजन करत कार्यकर्त्यांनी विधायक मार्गाने सरकारला जागे केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व भाजपा सावंतवाडी तालुका अध्यक्ष बांदा मंडल महेश धुरी यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा