You are currently viewing तळवणे येथे २६ ला भजन स्पर्धा

तळवणे येथे २६ ला भजन स्पर्धा

सावंतवाडी

श्री देवी माऊली नवरात्रौत्सव मंडळ तळवणे यांच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री देवी माऊली नवरात्रौत्सव मंडळ तळवणे यांच्या कडून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.यावर्षी मंडळा कडून नवरात्रौत्सवा निमित्त तळवणे माऊली मंदिर येथे 26 सप्टेंबर 2022 रोजी एक गाव एक मंडळ भजन स्पर्धा आयोजित केली आहे.प्रत्येक गावातील भजनी कलाकार व्यासपीठ मिळावे,गावातील एकता वाढावी व गावातील कलाकारांचे कलागुणाना वाव मिळावा या हेतुने ही स्पर्धा आयोजित केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत.
भजनाचा कालावधी 35 मिनीटांचा राहील.
स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर होईल
स्पर्धेत उत्कृष्ट गायक, पखवाज, तबला, झांज, कोरस, शिस्तबद्ध मंडळ अशी बक्षिसे राहतील
उत्कृष्ट प्रार्थना , उत्कृष्ट जय जराम, उत्कृष्ट रुपक, उत्कृष्ट गजर,उत्कृष्ट अभंग, उत्कृष्ट गौळण, उत्कृष्ट ज्ञानेश्वर माउली गजर अशी प्रत्येक गायनासाठी बक्षिसे असतील
प्रथम पारितोषिक 5000 रुपये,द्वितीय 3000 रुपये,तृतीय 2000 रुपये
व प्रत्येक भजन मंडळाला सन्मान चिन्ह प्रदान केले जाणार आहे.तरी जास्तीत जास्त संघांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा