सावंतवाडी
मळेवाड — मळेवाड गावात मायनिंग प्रकल्पाला सुरुवाती पासून विरोध केला जात असून मळेवाड जकातनाका व्यापारी संघटनेनही मायनिंग ला विरोध असल्याचे निवेदन उपसरपंच हेमंत मराठे याना दिले आहे.
मळेवाड,आजगावं,धाकोरे तसेच शिरोडा परिसरातील गावात मायनिंग खनिज प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असून त्याला स्थानिकांमधून मोठय़ा प्रमाणात विरोध केला जात आहे.यामुळे गावा गावात खनिज प्रकल्पाची चर्चा सुरू झाली असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकल्पामुळे गावात नैसर्गिक दृष्ट्या तसेच घरांची,शेती बागायती, आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार असून याचा त्रास पुढील पिढीला भोगावा लागणार आहे.त्यामुळे मळेवाड येथील व्यापारी बंधू व ग्रामस्थांनी या खनिज प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.तसेच हा खनिज प्रकल्प आपल्या गावात नको ,असे निवेदन येथील व्यापारी बंधू व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या जवळ देऊन असा पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प आपल्या गावात नको असे त्यांनी यावेळी सांगितलं.यावेळी आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा देणे गरजेचे आहे असे मत उपसरपंच मराठे यांनी व्यक्त केले.
यावेळी मळेवाड व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे,उपाध्यक्ष रमाकांत नाईक, माजी पंचायत समिती सदस्य बाळ शिरसाट, प्रकाश पार्सेकर, अशोक शिरसाट,मदन मुरकर उपस्थित होते.
फोटो ओळ — उपसरपंच मराठे याना मायनिंग विरोधातील निवेदन देताना व्यापारी.