पुण्याचे प्रसिद्ध सायकलपटू निरंजन वेलणकर यांचा सहभाग..
कुडाळ :
मानसिक आरोग्यासाठी सायकलिंग मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकलिंगबाबत जनजागृती करण्याकरिता पुणे येथील प्रसिद्ध सायकलपटू निरंजन वेलणकर यांनी आज 24 सप्टेंबर रोजी कुडाळ येथून 1500 किमीच्या सायकल राईट चा शुभारंभ करण्याचा निर्धार केला आहे.
रोटरी क्लब ऑफ कुडाळ व सायकललिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे अध्यक्ष अमित वळंजु यांनी प्रसिद्धी बापत्रकाद्वारे म्हटले आहे. ही सायकल राईड चार राज्यातून वीस दिवसात १४ ऑक्टोंबर ला पूर्ण होणार आहे. सिंधुदुर्ग – गोवा – बेळगाव – कलबुर्गी – हैदराबाद – वारंगल – गडचिरोली – नागपूर असा प्रवास होणार आहे. वेलणकर यांनी यापूर्वी लढाख आदि सोलो सायकल मोहीम यशस्वी केल्या आहेत.
सध्याच्या काळात मानसिक आरोग्य अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात. कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य तणाव व्यवस्थापन सकारात्मक मानसिक आरोग्य या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत केवळ मानसिक आरोग्याचे समस्याग्रस्त नाही, तर विशेष समस्याग्रस्त (जसे ऑटिझम, मेंटल रिटाडेड किंवा डाऊन्स सिंड्रोम असलेल्या व्यक्ती) यांच्यापासून अगदी युवा विद्यार्थी आणि प्रत्येकासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. ह्या सायकल प्रवासामध्ये हा विषय व्यापक समाजापुढे ठेवला जाईल. मानसिक रोग, मानसिक समस्या आणि मानसिक विकलांगता असलेल्यांच्या समस्या याबद्दल जागरूकता असणे गरजेचे आहे अशा व्यक्तींना आवश्यक ती मदत दिली जाऊ शकते सर्वसामान्य लोक शेतकरी युवा विद्यार्थी आणि सर्व यांच्यासोबत संवादातून या सायकल प्रवासात याबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न केला जाईल सायकलिस्ट सामाजिक संस्था समूह व लोकांसोबत बोलेल व स्थानिक पातळीवरील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतील.
मुख्य प्रवाहात नसलेल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे सुरुवातीला सायकललिस्टनि मुंबईमधील संस्थानसह राईड सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु महाराष्ट्रातील शहरांमध्ये याबद्दल थोडी तरी जागरूकता आहे त्यामुळे सर्वांधिक वंचित वर दूर राहिलेला प्रदेश घेण्याचा विचार केला त्यासह यातील मुख्य संदेश कम्फर्ट कंफर्ट झोनच्या पलीकडे जाणे आपल्याला मानलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाणे आणि अपरिचिताबद्दल संवेदनशील होणे हा आहे त्यामुळे हा सायकल प्रवास कोकणातील कुडाळ मध्ये सुरू होईल व नंतर गोवा कर्नाटक तेलंगणा व पुन्हा महाराष्ट्राच्या दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा त्यात समावेश असेल.
निरंजन वेलणकर यांनी लडाखसह अनेक सोलो सायकल महिमा केल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रात आरोग्य व एचआयव्हीबद्दल जागृतेसाठी आणि योग व ध्यानाच्या प्रसारासाठी ही सायकल प्रवास केला आहे.