You are currently viewing पोषण माह निमित्त फोंडा येथे कार्यक्रम संपन्न

पोषण माह निमित्त फोंडा येथे कार्यक्रम संपन्न

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्त्वाचा- अमोल पाटील

 

वैभववाडी :

सप्टेंबर महिना हा सध्या पोषण माह म्हणून सर्वत्र साजरा होत आहे. याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . एकात्मिक बाल विकास अधिकारी अमोल पाटील यांनी स्वागतपर भाषणात बाळासाठी सकस पोषण आहार किती महत्त्वाचा याबाबत अंगणवाडी सेविकांना आणि पालकांना माहिती दिली . बाळासाठी घरामध्ये आई जशी महत्त्वाची असते तशीच अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात.पोषण माह निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजनाबद्दल पाटील यांनी यावेळी आयोजकांची स्तुती केली .

अंगणवाडी सेविकांनी यावेळी प्रवेशद्वार ते सभागृह अशी पोषण आहार पालखी काढली. प्रीती शिंदे आणि प्राची मराठे या गरोदर मातांचे ओटी भरण विविध फळे , सकस कडधान्य , पालेभाज्या यांनी करण्यात आले . त्यानंतर विहान फोंडेकर या 6 महिन्यांच्या बाळांचा प्रथम अन्नप्राशन समारंभ करण्यात आला . सहा महिन्यानंतर बाळाला कोणते सकस अन्न आणि कसे द्यावे याचे मार्गदर्शन मातांना करण्यात आले . सकस अन्न पदार्थ , औषधी भाज्या यापासून गरोदर माता आणि बाळ यांच्यासाठी विविध पोषक आहार पाककृती यांचे प्रदर्शन भरवण्यात आले . विशेष म्हणजे विविध पोषक वनस्पतींनी सजलेली लावण्या येंडे ही चिमुकली पोषण परी देखील याठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती . तसेच सुदृढ बालक स्पर्धा भरवण्यात आली . सभागृहाबाहेर गहू , तांदूळ , मूग , चणे अशा पौष्टिक जिन्नस वापरून रांगोळी सजवण्यात आली होती . यावेळी उपस्थित मुलांना प्रोत्साहन म्हणून शालेय वस्तू भेट देण्यात आल्या .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पोषण माह कार्यक्रम फोंडा येथे उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पर्यवेक्षिका उमा हळदवणेकर , आरोग्य सेविका मंदा राणे उपस्थित होत्या . फोंडघाट ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी सरपंच संतोष आग्रे आणि ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सावंत तर आभार प्रदर्शन वनिता मराठे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानसी सावंत , स्वाती रासम ,प्रियंका कामतेकर , कविता सावंत , मनस्वी सावंत , सायली कदम , माया मेस्त्री , सुलभा लाड आदी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मेहनत घेतली .

प्रतिक्रिया व्यक्त करा