म्हाळुंगे गावाला चाकरमान्यांनी केली शैक्षणिक मदत….

देवगड :

देवगड तालुक्यातील म्हाळुंगे हे एक खेडेगाव गावची जनसंख्या लगबग एक हजार,शाळा सातवी पर्यंत विध्यार्थी संख्या 32 मागील सात महिन्यापासून मुलांचा शाळा किंवा अभ्यास याचा संपर्क शून्य,गावात इंटरनेट ठराविक ठिकाणी रेंज व अँड्रॉय मोबाईल अगदी 3/4 पालकांच्या हाती या मुलांना शिक्षण प्रवाहात आवड टिकवून ठेवण्यासाठी काही करणे गरजेचे होते

करोनामुळे तसेच गणेशोत्सवा करीता आलेली चाकरमानी मंडळी यांना विषय सांगितल्या नंतर त्यांनी सांगितले काही आर्थिक मदत करायची असेल तर करू, यातून निधी उभा राहिला व गांधी जयंती दिवशी मुख्याध्यापक श्री मांजरेकर गुरुजी,गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली,याकरिता जवळपास 10000 रुपये खर्च झाले

पुस्तके हातात मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता हीच उपक्रमाची पोहच होती

उपक्रम यशस्वी होण्याकरिता रामकृष्ण राणे,संजय तावडे,प्रकाश राणे,संदीप राणे,श्यामसुंदर घाडी, हरिकृष्ण राणे,महेश यादव,उमेश राणे,मुन्ना राणे,प्रशांत राणे यांनी पुढाकार घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा