You are currently viewing ट्रॉलरवरून पडून खलाशी बेपत्ता

ट्रॉलरवरून पडून खलाशी बेपत्ता

मालवण

सर्जेकोट कवडा रॉकसमोरील समुद्रात श्री देवी केळबाई ट्रॉलरवरील खलाशी महेंद्र दामोदार पालयेकर (३१ रा. मुंबई) हा ट्रॉलरवरून पडून बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ट्रॉलर मालक चिराग मयेकर यांनी खलाशी पालयेकर बेपत्ता झाल्याची खबर मालवण पोलीस स्थानकात दिली आहे. दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी श्री देवी केळबाई ट्रॉलर सर्जेकोट कवडा रॉकसमोरील समुद्राकडे आला असता ट्रॉलरवरील खलाशी महेंद्र पालयेकर हा लघुशंका करण्यासाठी ट्रॉलरच्यावर आला. त्यावेळी पालयेकर याचा तोल जाऊन तो समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याचे मयेकर यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे. पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर हे अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 8 =