You are currently viewing ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन.

‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन.

वैभववाडी

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांच्यावतीने २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यटनाचा पुनर्वापर’ या जागतिक पर्यटन दिनाच्या संकल्पनेवर आधारित ‘कोकणचे पर्यटन- दशा आणि दिशा’ या विषयावर पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री.विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांचे गुगल मिट ॲपद्वारे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर असणार आहेत.
दि.२७ सप्टेंबर,२०२२ रोजी रात्री ठीक ८.३० वाजता गुगल मिट ॲपद्वारे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागात पर्यटनाला खूप वाव आहे. आतापर्यंत पर्यटन क्षेत्रामध्ये झालेला विकास आणि भविष्यातील पर्यटन विकासाची दिशा काय असायला हवी याची माहिती होण्याच्या दृष्टीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पर्यटनाशी संबंधित व्यक्ती, व्यावसायिक व संस्था यांनी या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ
https://meet.google.com/kzd-mxbx-eiy
या गुगल मिट लिंकव्दारे घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर, उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण व सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा