You are currently viewing देवगड मध्ये भाजपला खिंडार..

देवगड मध्ये भाजपला खिंडार..

देवगड वाघोटन गावातील उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य सहित असंख्य राणे समर्थक भाजप कार्यकर्तेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

देवगड प्रतिनिधी :

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा बँक अध्यक्ष जिल्हा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून वाघोटन उपसरपंच सौ सेजल टुकरल, ग्रामपंचायत सदस्य फरिद युसुफशेठ काझी, दिनेश तेली, सदस्या सौ दिपाली गोठणकर, सौ श्रृती घाडी, माजी ग्रा.पं.सदस्य शकील मुल्ला, विजय कोठावळे, कार्यकर्ते राजेंद्र तेली, नरेश तेली, फरहान काझी, नितीन खेडेकर उमेश जोशी, भुषण तिर्लोटकर, अंकुश वानिवडेकर, रमेश येरम, मनोहर परब, यांच्या समवेत जवळपास १५० कार्यकर्ते यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, माजी तालुका प्रमुख अॅड.प्रसाद करंदीकर, संदेश पटेल, उपतालुका प्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुका प्रमुख अमेय जठार, विभाग प्रमुख विष्णू घाडी, संदीप डोलकर, रमाकांत राणे, दिनेश नारकर, वाघोटन शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी आपल्या वाघोटन गावातील समस्या जाणून घेण्यासाठी पुढील आठवड्यात पालकमंत्री उदय सामंत स्वत: येतील तसेच खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर यांच्या माध्यमातून गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असं आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा