You are currently viewing योग्य काळजी घ्यायला हवी अन्यथा हवामान बदल अपरिवर्तनीय  – डॉ गिरीश जठार

योग्य काळजी घ्यायला हवी अन्यथा हवामान बदल अपरिवर्तनीय  – डॉ गिरीश जठार

सावंतवाडी

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे . कार्बन डाय आॅक्साईड वायुचे प्रमाण ४०० पीपीएम च्या पुढे गेलेले आहे अशा स्थितीमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढविणे ही आज काळाची गरज आहे. अन्यथा योग्य काळजी न घेतल्यास हवामान बदल अपरिवर्तनीय होईल . अशी माहिती डॉ गिरीश जठार , सहाय्यक संचालक संशोधन विभाग , सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशन, मुंबई यांनी दिली .

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित’ हवामान बदल’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते .
प्राणिशास्त्र विभाग श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी व सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हवामान बदल ‘या विषयावर आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .
चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.सौ. प्रतीक्षा सावंत यांनी केले .सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशन या संस्थेचा उद्देश व भविष्यामध्ये आखलेले प्रोग्रॅम्स याविषयी सविस्तर माहिती संचालक डॉ दीपक आपटे यांनी दिली .या उपक्रमाचे प्रायोजक टाटा मोटर्स यांच्यावतीने अंजली निकम
यांनी टाटा मोटर्स ची पर्यावरण संवर्धनामधील भूमिका विशद केली .
डॉ गणेश मर्गज यांनी प्रमुख वक्ते डॉ.गिरीश जठार यांचा परिचय करून दिला . डॉ गिरीष जठार यांनी आपल्या सादरीकरणात असं सांगितलं की हवामान बदल याला माणूस कारणीभूत आहे कारण
औद्योगिकरणानंतर पृथ्वीच्या तापमानात बदल व्हायला सुरुवात झाली. याचे मुख्य कारण म्हणजे जीवाश्म इंधनाचा शोध व त्याचा वारेमाप वापर यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत गेलं आणि त्यानंतर पृथ्वीचे तापमानामध्ये ० .७५ अंश सेल्सिअस एवढी आजपर्यंत वाढ झाली .याचा परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढायला लागली आहे .याचा परिणाम शेती, मासेमारी आरोग्य या बरोबरच संपूर्ण जीवसृष्टीवर झालेला आहे. नैसर्गिक आपत्ती वाढलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हवामान बदलाचा परिणाम जाणवलेला आहे .दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती . दुष्काळी भागातील लोक सैन्यामध्ये भरती झाले त्यामुळे शिवाजी महाराजांनास्वराज्य निर्मीतीमध्ये फार मोठा आधार मिळाला. आज अनेक देश पर्यावरणपूरक उपक्रम राबवित आहेत . पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारने ही आजच्या काळाची गरज आहे . वाढलेले प्रदूषण , हवामान बदल व त्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यामुळे माणसाचे जीवन असह्य झाले आहे .यावर उपाय म्हणजे जंगलांचे संवर्धन करणं .झाडे लावणे , नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करणे हा आहे. हा जागतिक प्रश्न असल्यामुळे जगातील सर्वच देशांनी यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत .आपल्या देशही यामध्ये मागे नाही .हवामान बदलाच्या परिणामांना आपण सामोरे जायला हवे. यापुढे इलेट्रीकल वाहनांचे प्रमाण रस्त्यांवर जास्त दिसेल . असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ.गणेश मर्गज यांनी केले
तर आभार कु. श्रृती पांचाळ हिने मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा