वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. 42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या राजू श्रीवास्तव याला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत आणि सर्वांना रडवून सर्वांना हसवणाऱ्या राजू यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
मैंने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. तसेच ‘बिग बॉस 3’, ‘नच बलिए’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं.