You are currently viewing सेवा पंधरावडा निमित्त सिंधुदुर्ग येथे भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने कणकवलीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

सेवा पंधरावडा निमित्त सिंधुदुर्ग येथे भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने कणकवलीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

भाजप पदाधिकारी व भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती.

कणकवली

देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरावडा साजरा करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी यांनी आज मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कासार्डे बंडवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर एक या शाळेचा परिसर स्वच्छ करून सेवा पंधरावडा मधील स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी शाळेतील संपूर्ण परिसर स्वच्छ करून सांडपाण्यासाठी शोषखड्डा मारण्यात आला. यावेळी कणकवली तालुका माजी सभापती दिलीप तळेकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर,भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण,जिल्हा सरचिटणीस शशीकांत इंगळे, कासार्डे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाताडे, सोसायटी चेअरमन श्रीपाद पाताडे, तंटा मुक्ती अध्यक्ष सुहास नकाशे, प्रकाश शेलार,दिनेश मुद्रस,भटके विमुक्त आघाडी लोकसभा संघटक वसंत चव्हाण, बसुराज सुर्यवंशी,अनिल इंगळे,विजय विभुते,किरण शिंदे,सोमनाथ सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सानिका जाधव व भाजपा भटके विमुक्त आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी व
अनुसूचित जाती जमाती सिंधुदुर्ग जिल्हा आघाडी यांच्याकडे स्वच्छता अभियानाची जबाबदारी दिली असून सावंतवाडी कुडाळ या दोन्ही मतदारसंघांमध्ये अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे तर.कणकवली विधानसभा मधून भटके विमुक्त आघाडी ने सुरुवात केली आहे या दोन्ही आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकमेकांशी संपर्क ठेवून विविध अभियान जिल्ह्यात राबवत आहेत.आजच्या अभियान वेळी बोलताना माजी सभापती दिलीप तळेकर व माजी पं.स.सदस्य प्रकाश पारकर यांनी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीला लागेल ते सहकार्य सर्व पदाधिकारी करू. आघाडीतर्फे जिल्ह्यात जस आता काम चालू आहे त्याच प्रकारे चालू ठेवा येणाऱ्या काळात निश्चितपणाने आपल्या कामाचे फळ आपल्याला मिळेल.. एकत्र याल एकत्र असाल तर आपण सर्व समाजाला न्याय देऊ शकतो त्यामुळे संघटित होणे काळाची गरज आहे आघाडी कडून समाज संघटित करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण कटिबद्ध राहा. लागेल ते सहकार्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या नात्याने आम्ही आपणास देऊ असा शब्द या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दिला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर स्वच्छता अभियानासाठी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांनी पुढाकार घेतला. भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आजच्या स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी व भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा