You are currently viewing कोकण सुपुत्र, प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सत्यवान यशवंत रेडकर यांचे खेड, चिपळूण मध्ये नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने

कोकण सुपुत्र, प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सत्यवान यशवंत रेडकर यांचे खेड, चिपळूण मध्ये नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने

संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात निशुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यानाचे शतक पूर्ण करणारे, सात शैक्षणिक अर्हता असणारे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सावंतवाडी तालुक्यातील मु.पो.कवठणी (बोरभाटवाडी) या गावचे सुपुत्र, श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांचे खालील वेळापत्रकाप्रमाणे खेड तसेच चिपळूण तालुक्यात, *नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (COMPETITIVE EXAM CAREER GUIDANCE)* आयोजित केली गेली आहेत.

*शनिवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२२*
१) सकाळी ७.३० वाजता
सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्यु.काँलेज खेड( या शैक्षणिक संकुलात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित)
२. सकाळी १०.३० वाजता, नूतन इंग्लिश स्कूल, तिसंगी, ता. खेड

रविवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२२
१) *सकाळी १०.०० वाजता*
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती, चिपळूण

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालक वर्गाने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन माननीय श्री. सत्यवान रेडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा