अलिबाग (सचिन पाटील)
खारेपाट विभागासाठी 10 कोटी 02 लाख 63 हजारांचा निधी मंजूर; आ. महेंद्रशेठ दळवींची वचनपुर्ती
अलिबाग, (वार्ताहर) अलिबाग-मुरुडचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेला शब्द सत्यात उतरवला असून खारेपाट विभागासाठी तब्बल 10 कोटी 02 लाख 63 हजारांचा निधी पाणीपुरवठा योजनांसाठी मंजूर केला आहे. या योजनांची कामे लवकरच सुरु होणार आहेत. यामुळे आ. महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने खारेपाट विभागात विकासगंगा अवतरली असल्याचे दिसून येत आहे.
खारेपाटच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नसल्याचा शब्द आमदार महेंद्र दळवी यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा खारेपाट विभागाचे तडफदार नेतृत्व करणारे राजाभाई केणी यांना दिला होता. त्यानुसार आ. महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने खारेपाटातील प्रमुख 7 पाणी पुरवठा योजना मंजूर करुन घेण्यात यश आले आहे. ही एकूण 10 कोटी 02 लाख 63 हजारांचा रुपये निधीची कामे आहेत. यामुळे खारेपाटातील पाणीटंचाई नाहीशी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून आ. महेंद्र दळवी आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांचे धन्यवाद व्यक्त करीत आहेत. *मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये देहेन भाकरवड योजनेसाठी 93, 68,446 रुपये, पोयनाड पाणी पुरवठा योजनेसाठी 1,98,75,763, कुर्डुस पाणी पुरवठा योजनेसाठी 1,92,99,532, चरीसाठी 68,83,174, कुरकुंडी कोलटेंबी पाणी पुरवठा योजनेसाठी 72,75,652, नवेनगरसाठी 82, 29,762, शहापुर पाणी पुरवठा योजनेसाठी 2,92,31,340 रुपयांचा निधीच्या योजनांचा समावेश आहे*.
***
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असताना येथील नागरिकांना पाण्यासारख्या मुळभूत गरजेसाठी झगडावे लागत होते, ही अशोभनीय बाब आहे. याचाच राग म्हणून येथील मतदारांनी येथील काम न करणार्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदान करुन शिवसेनेचा आमदार निवडून आणला. तेव्हापासून खारेपाटच्या विकासाचे चक्र अधिक गतीमान झालेले आहेत. नव्याने मंजूर झालेल्या 7 पाणीपुरवठा योजनांसाठी 10 कोटी 02 लाख 63 हजारांचा रुपयांच्या मंजूर झाला असून येथील पाणीटंचाईवर पुर्णपणे मात करता येईल.
– *राजा केणी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख*