वाहतूक करताना वाहने जपून चालवा असे रोहन कदम यांचे आवाहन
कणकवली:
जशी आपल्या घरी आपली कोणतरी वाट पाहत असते तशी मुक्या प्राण्यांच्या घरी देखील त्यांची वाट पाहत असणार. रस्त्यावरुन वाहतूक करत असताना कृपया वाहने जपून चालवा. रस्त्यावर मुके प्राणी दिसल्यास गाडीचा वेग कमी करा. मुक्या प्राण्यांना पहिले जाऊ द्या मगच आपण मार्गस्थ व्हा. असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष रोहन कदम यांनी केले आहे. आज दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी कणकवली महामार्गावर एक कुत्रा गाडीच्या ठोकरल्याने जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी वाट पाहत होता त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष रोहन कदम, प्राणीमित्र सुनिल तेली व त्यांचे सहकारी तिथे पोहोचले.व त्या जखमी कुत्र्याला घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये पोचले. डॉक्टरने उपचार चालू केले मात्र ठोकर एवढी जबरदस्त होती की उपचार चालू असतानाच त्या कुत्र्याने प्राण सोडले. मित्रांनो कुत्रा, कोल्हा, लांडगे, गवारेडे, शेखरू, बिबटे ही आपली संपत्ती आहे ती जपली पाहिजे असे आवाहन रोहन कदम यांनी केले