You are currently viewing वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी नगरसेवक अजय गांगण यांच्याकडून रोटरी क्लबच्या पेशंट बँकेला विविध वस्तू भेट

वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी नगरसेवक अजय गांगण यांच्याकडून रोटरी क्लबच्या पेशंट बँकेला विविध वस्तू भेट

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रम

कणकवली

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे माजी रोटेरियन अजय गांगण यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ अजय गांगण, कणकवलीच्या माजी नगराध्यक्ष मेघा गांगण कुटुंबीयांनी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या पेशंट बँकेला एक बेड, वाटर बेड, एअर बेड भेट दिला आहे.

हा कार्यक्रम कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील कार्यालयात पार पडला, यावेळी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, सचिव उमा परब, ट्रेझरर माधवी मुरकर, दादा कुडतडकर, धनंजय कसवनकर, लवू पिळणकर, मोहिनी राठोड, अनिल कर्पे, महेंद्र मुरकर, गुरू पावसकर, नितीन बांदेकर, आसावरी गांगण, सोम गांगण, वीरेंद्र नाचणे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणालेत गांगण कुटुंबीयांनी नेहमीच कणकवली शहराच्या विकासात योगदान देताना सामाजिक कृतज्ञता भाव जपला आहे. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या पेशंट बँकेला विविध वस्तू भेट म्हणून दिल्यात त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. असे सांगताना त्यांनी यावेळी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या कार्याचे देखील कौतुक केले.

रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर यांनी यावेळी गांगण कुटुंबीयांचे आभार मानले. तसेच रोटरी क्लब च्या पेशंट बँकेच्या माध्यमातून आबाला वृद्ध रुग्णांना सातत्याने वस्तूच्या स्वरूपात त्यांच्या आधारपणाच्या कालावधी करता सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत या बँकेचा फायदा कणकवली तालुक्यातील अनेक गरजू लोकांना झालेला आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. रोटरी क्लब सातत्याने सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा