सावंतवाडी:
सध्या सावंतवाडी तालुक्यात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.ओठवणे येथील प्रकाश होळकर वय वर्षे ४० या तरुणाला १७ सप्टेंबर २०२२ रोजी एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने घरात घुसून हल्ला केला व त्याच्या हाताला ठिकठिकाणी चावा घेऊन मोठे घाव केले.
सदरील घटना ओठवणे येथे काल रात्री आठच्या सुमारास घडली.कुत्र्याच्या चाव्याने रक्ताबंबाळ झालेल्या व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले.कुत्र्याचे दात रुसलेला हात त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये दोन ते तीन मिनिटे होता सदर व्यक्ती मोठ-मोठ्याने आरडाओरड करून वेदनेने तळमळत झटापटी करत होता अखेर नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे तो पिसाळलेला कुत्रा पळून गेला.
शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना, मोटरसायकल वरून कामाला जाणाऱ्या व्यक्तींना तसेच वयोवृद्धज्येष्ठ नागरिकांना या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यां कडून होणाऱ्या अचानक हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे.तसेच दोन महिन्यात शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या गुरांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचा परिणाम वर्दळीच्या ठिकाणी उभी असलेली किंवा बसलेल्या गुरांमुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होते तर पंधरा दिवसांपूर्वी शाळा सुटल्यावर मुलाला मोटरसायकल वरून घरी जाणाऱ्या एका व्यक्तीला मोकाट फिरणाऱ्या बैलाने उडून दिलं होतं त्यात मुलाला व त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली होती.या प्रकारची घटना गावां व शहरांमध्ये घडत आहेत अशा या अपघातांची गांभीर्याने दखल घेतल्यास पुढे होणारा अनर्थ टळू शकतो.
शहरामध्ये व गल्ली गल्ली मध्ये मोकाट फिरणारी गुरे व भटक्या कुत्र्यांचा उद्रेक वाढत आहे.हा उद्रेक थांबवण्याकरिता शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.या अगोदर कित्येक निवेदन कित्येक तक्रारी नगरपरिषदेकडे दिल्या गेल्या आहेत पण त्याबाबत अजूनही ठोस पाऊल उचलले गेले नाही.आजच जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सांगली नगरपालिकेला फोन करून कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात माहिती घेतली होती तसेच काल त्यांनी कणकवली येथील नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी या विषयाची चर्चा केली असता नगराध्यक्ष नलावडे यांनी त्यांना सांगितले की आपण एक वर्षांपूर्वी कुत्र्यांची नसेबंदी उपक्रम आमच्या नगरपंचायत मार्फत राबवला होता.
आता पुन्हा एकदा हा उपक्रम राबवण्यासाठी काही दिवसातच नागपूरची टीम कणकवली मध्ये दाखल होणार आहे याचा फायदा आपल्या ही नगरपालिकेला होऊ शकतो असं त्यांनी मसूरकर यांना सांगितले. या विषयासंदर्भात मसूरकर यांनी सावंतवाडीचे मुख्याधिकारी यांना फोन करून या विषयावर चर्चा केली असता जावडेकर यांनी या विषया संदर्भात आपली सहमती दर्शवली.उद्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मुख्याधिकारी जावडेकर यांना सदर विषयाचे निवेदन देऊन लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांची नसबंदी व मोकाट फिरणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी विनंती करणार आहोत.
जेणेकरून शाळेतील मुलांना, वाहन चालकांना व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या भीतीपासून दिलासा मिळू शकेल.अशी माहिती जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी जनतेला दिली आहे तरी आपण सर्वांनी या मोकाट सुटलेला कुत्र्यांपासून सावध राहावे.