बांदा
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थीच शिक्षक बनून एक दिवस शाळेचे व्यवस्थापन पाहत असतात.
गेली दोन वर्ष कोरानाच्या पार्श्वभूमीवर हा शिक्षकदिन साजरा करता येणे शक्य झाले नव्हते चालू वर्षीही गणेश चतुर्थी सुट्टीत हा शिक्षक दिन आला होता या सुट्टी नंतर बांदा शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला.
या दिवशी शाळेचा मुख्याध्यापक म्हणून अमोघ वालावलकर तर उपमुख्याध्यापक म्हणून ऋतुजा वडर हिने तर लेखनिक म्हणून त्रिशा गावडे व युवराज नाईक याचबरोबर शिक्षक म्हणून 42 तर परिचर म्हणून 4 विद्यार्थ्यांनी दिवसभर शाळेचे व्यवस्थापन सांभाळले.
या दिवशी विद्यार्थांनी प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला.संध्याकाळी विविध खेळ व बालसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षक बनून दिवसभर केलेल्या कामकाजाच्या अनुभवांचे कथन विद्यार्थ्यांनी केले. या दिवशी शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. या दिवशी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांमधून आदर्श शिक्षक म्हणून लौकीक तळवडेकर व आदर्श शिक्षका म्हणून पूर्वी बांदेकर हिची निवड करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शालेय मंत्री मंडळ,शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले.