“मागील दिवसात, सागरी हवामानाचा अंदाज न आल्याने सागरी दुर्घटना शक्य होती. पण आता रिलायन्स फाऊंडेशनने प्रसारित केलेल्या समुद्रातील सागरी हवामानाचा अंदाज मेसेजमुळे ही शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे” असे मत मच्छीमार गणेश आजविलकर, गावडे आंबेरे , रत्नागिरी यांनी व्यक्त केले आहे. हे गाव शहरापासून २५ किमी अंतरावर असून मत्स्य व्यवसाय व शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
गणेश आजविलकर (वय ४९ ) हा माध्यमिक शाळा उत्तीर्ण झाले असून, त्यांना २ मुले आहेत. गणेश यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मासेमारीला सुरुवात केली कारण त्याचा कौटुंबिक व्यवसाय चालवायचा होता. त्याचा मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे आणि तो पूर्णपणे रोजच्या मासेमारीवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे गिल नेट असलेली फायबर बोट आहे. घरात गणेश हे एकच कमवते आहेत .
चक्रीवादळाची कोणतीही शक्यता नव्हती पण लगेच वाऱ्याचा वेग वाढू लागला अशा पूर्वी अनेक घटना घडल्या आहेत . समुद्रात जोरदार वारा नव्हता की वातावरणात चक्रीवादळाची चिन्हे नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही मासेमारीसाठी निघालो. पण समुद्रात काही अंतरावर जाताच अचानक वादळ सुरू झाले. आम्ही पुरेसे भाग्यवान होतो, कारण आम्ही खोल समुद्रात पोहोचलो नाही. मात्र खोल समुद्रात घुसलेल्या मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते . मात्र आता या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. कारण समुद्रातील सागरी हवामानाचा महितीचा अंदाज रिलायन्स फाऊंडेशनने मोफत उपलब्ध करून दिली आहे. मी 2018 मध्ये सागरी हवामानाची सेवा व्हाट्सप्प वर नावनोंदणी करून सुरू केली आहे, त्यानंतर 4 वर्षांपासून मी सतत रिलायन्स फाऊंडेशनकडून सागरी हवामानाचा अंदाज व्हाटसप वर प्राप्त करत आहे.
त्यामुळे आम्हाला खोल समुद्रात दुर्घटनेपासून बचाव करता आला. जेव्हा जेव्हा आम्हाला रिलायन्स फाऊंडेशनकडून संदेश येतो की समुद्रात मासेमारीसाठी हवामान योग्य नाही तेव्हा आम्ही समुद्रात मासेमारीसाठी जात नाही . आमच्या बोटीचा आकार खूप लहान आहे जो जोराच्या वाऱ्याच्या वेळी समुद्रात टिकू शकत नाही. अशा प्रकारे समुद्रात न गेल्याने आपण आपला जीव वाचवू शकतो आणि खर्चही वाचवू शकतो. मासेमारीच्या फेरीसाठी मुख्य खर्च डिझेलचा आहे, प्रत्येक मासेमारीच्या एका फेरीसाठी जवळपास 10 लिटर डिझेल खर्च केले जाते ज्यामुळे 1000 रुपये (1 लिटर डिझेल अंदाजे 100 रुपये ) होते. जुलै 2021 ते मे 2022 या कालावधीत रिलायन्स फाऊंडेशनच्या सतर्कतेमुळे आम्ही 5 वेळा समुद्रात प्रवास केला नाही. त्यामुळे डिझेलवर जवळपास 5000 हजारांची बचत झाली. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून श्री गणेश हे ही मौल्यवान माहिती वैयक्तिक माहिती म्हणून न ठेवता , जेव्हा जेव्हा उच्च लाटांचा इशारा असतो, चक्रीवादळाचा इशारा असतो तेव्हा ते त्यांच्या सहकारी मच्छिमारांना माहिती देत असत. तसेच ते रिलायन्स फाऊंडेशनला नम्रपणे विनंती करतात की त्यांनी ही मौल्यवान सेवा सर्व मच्छिमारांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या मासेमारी व्यवसायात फायदा होईल