You are currently viewing शब्द.. शब्द… शब्द …

शब्द.. शब्द… शब्द …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शब्द.. शब्द… शब्द …*

शब्द बांधती मनोरे शब्द पाहतात स्वप्न
नाही भरोसा शब्दांचा कधी करतील भग्न …

शब्द चंचल चंचल शब्द धीर नि गंभीर
शब्द अभंग राऊळी शब्द गुलाल अबीर …

शब्द नृत्य शब्द ताल शब्द मृदुंग बोलती
ज्ञानियाचा राजा जगी बोल गीतेचे सांगती..

शब्द सुंदर सात्विक कधी आस्तिक नास्तिक
शब्द संस्कृती बोलती मुखातून ते मौक्तिक..

शब्द निनाद हृदयी शब्द अमृत पयोधी
मोती शिंपल्यात शब्द शब्द सन्मान उपाधी…

शब्द रंग शब्द रूप शब्द गाभाऱ्यात धूप
विषवल्ली कधी शब्द किती शब्दांचे अप्रूप …

किती शब्दांचे विभ्रम शब्द संभ्रमी टाकती
गळा धुंगरू पायात शब्द रूणुझुणू नाचती …

शब्द चपला आभाळी शब्द गोंधळी गारूडी
शब्द सुगंध व्योमात निशिगंधाची परडी …

शब्द साम्राज्य उलथे शब्द देश कालातीत
शब्द मलम तलम शब्द मखमल पोत…

किमयाच शब्द स्रोत शब्द गारूड नि पुंगी
कधी बनतात शब्द उत्शृंखल छंदीफंदी …

शब्द शब्दातीत वर्णू कसे शब्द सांगा
शब्द झुल्यात बसवा आणि आभाळात टांगा …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १४/०९/२०२२
वेळ : दुपारी १/५७

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + fifteen =