स्वच्छ मालवणसाठी नगरपरिषदेचा १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ अमृत महोत्सव हा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन.
कचरा मुक्त शहर हि संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Housing & Urban Affairs) स्वच्छ अमृत महोत्सव या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी Indian Swachhata League अंतर्गत Rally of Youth for Garbage Free Beaches, Hills and Tourist Places या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मालवण नगर परिषदेने मालवण योद्धा (Malvan Warriors) या नावाने शहराच्या संघाची नोंदणी केली आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी मालवण नगर परिषदेने बंदर जेटी येथे सकाळी ठीक ८ वाजता स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे यादिवशी ठीक आठ वाजता सामुहिक स्वच्छता शपथ घेतली जाणार आहे व त्यानंतर स्वच्छ सागरी किनारा दिनाच्या अनुषंगाने समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
मालवण शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसेच शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे या कारणांनी मालवण शहर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून नावारूपास येत आहे. आपल्या शहराची पर्यटकांना भुरळ घालणारी निसर्ग समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी व शहर स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे यादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी केले आहे.
तसेच इंडियन स्वच्छता लीग या संपूर्ण देशातील 1800 शहरे सहभागी असलेल्या स्पर्धेत मालवण शहराला विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/ या लिंकवर आपली नावनोंदणी करून दिनांक 17 सप्टेंबर रोजी बंदर जेटी येथे होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत उपस्थित राहावयाचे आहे.