बांदा :
बांद्यातील गोगटे वाळके महाविद्यालयाची तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी कु. श्रद्धा हेवाळकर हिने मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात विद्यापीठीय अंतिम फेरीत इंग्रजी वक्तृत्व या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या एकूण अकरा विभागामधून सुमारे ४४ स्पर्धक या अंतिम फेरीत सहभागी झाले होते. या स्पर्धकांमधून तिने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे आंतरविद्यापीठीय पातळीवरील संघात निवड होण्यासाठी ती पात्र ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे अध्यक्ष श्री. डी. बी. वारंग, सचिव श्री. एस. आर. सावंत, खजिनदार श्री. टी. एन. शेटकर, कार्यकारी मंडळ सदस्य श्री. सुभाष मोर्ये, श्री. प्रेमानंद देसाई, श्री. भगवान देसाई, श्री. प्रेमानंद नाडकर्णी, श्री. मंदार कल्याणकर, श्री. शीतल राऊळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिला प्रा. डॉ. दत्तगुरू जोशी, प्रा. अनिल शिर्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन. डी कार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले.