पालकमंत्र्यांना आता सांस्कृतिक मंत्री करा आ. नितेश राणे करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी…..
कुडाळ :
आज दिनांक १३ ऑक्टॉबर २०२० रोजी आ. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली. व त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी पावसाळ्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टी व पुरहाणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असूनही त्याचे महसुल विभागाकडून रीतसर पंचनामे घालून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे निसर्ग चक्रीवादळातील झालेल्या नुकसानापैकी सुमारे 8 कोटी रुपयांची मागणी करूनही अद्यापपर्यत शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही. गतवर्षी झालेल्या भातशेतीच्या नुकसाणीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 22 कोटी रुपयांची मदत दिली होती त्यापैकी मतदारसंघातील देवगड तालुक्यात 1 कोटी 62 लाख , कणकवली तालुक्यात 3 कोटी 86 लाख व वैभववाडी तालुक्यात 1 कोटी 17 लाख असे नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले होते त्याचप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व अडचणी मध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीद्वारे दिलासा मिळण्यासाठी शासनाकडे त्वरित मागणी प्रस्ताव सादर करावा अशी विनंती आ. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना केली.
असल्याचे सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांचा संवाद नाट्य क्षेत्राशी जवळीक आहे. त्याप्रमाणे ते जिल्ह्यात नाटक कंपनी किंवा एखाद्या कलाकारा प्रमाणे जिल्ह्यात येतात. डायलॉग मारतात. टाळ्या मिळवितात आणि निघुन जातात. त्यामुळे त्यांना सांस्कृतिक मंत्री करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत, असे आ नितेश राणे यानी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे, बंड्या नारकर, प्रितेश गुरव, योगेश घाडी आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना उपायासाठी आम्ही कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीचे एन्टी बॉडीज टेस्ट करण्याची मागणी केली होती. यांच्या बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्षाना निमंत्रण दिले जात नाही. कोणाचा कोणाला निर्बंध नाही. व्हीसी घेतल्या जातात. त्याचा काय उपयोग झाला ? असे जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्या उत्तर देवू शकले नाही. आमच्या जिल्ह्याची स्थिती सरकारकडे पोहोचली पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय बैठक घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ऑनलाईन बैठक तरी घ्या. त्यात सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करा, असे आवाहन आ राणे यानी यावेळी केले.
पत्रकार परिषद