*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*
🚩 *धर्मवीर शंभूराजे.*🚩
आठवावे सदैव शुर शंभूराजे धर्मवीर,
कार्य केले आणि ठरले कर्तुत्वान कर्मवीर..।
नितीने राज्य केले अनितीला केले नष्ट,
सत्यासाठी लढले भरपूर केले कष्ट..।
शंभू राजेंनी चालविला छत्रपतींचा वारसा,
खऱ्याचे खोटे करणाऱ्याचा फोडला आरसा..।
धर्माला बळ दिधले अधर्म केले निर्बल,
शक्ती दिली त्यांना जे कोणी होते दुर्बल..।
आपला आठविता सारा महापराक्रम,
ठरवितो आम्ही तेव्हा आमचे अग्रक्रम..।
मोडले तरी वाकले नाहीं असा आपला बाणा,
सांगतो सर्वांना अंगी आपल्या आणा..।
साहित्यातही शंभूराजे आपणास होती आवड,
खांद्यावर राहायची भूतदयेची कावड..।
आपण दाविली वाट तो आमचा महामार्ग,
त्यावरून चालतो दाखवील आम्हा स्वर्ग..।
मानाने कसे जगायचे आम्हास शिकविले,
तेच तत्व आम्ही या जीवनात टिकविले..।
अशीच ठेवा कृपा आमच्यावर शंभूराजे,
वादळातही उडणार नाही आमचे तंबू राजे..।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*
Advertisement
*स्थापत्य क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणारे भारतरत्न*
*सर मोक्षगुंडम विश्वेश्वर यांच्या जन्मदिना निमित्त विनम्र अभिवादन! 🙏*
*अभियंता दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!💐💐*
*शुभेच्छुक*
*श्री. अखिल रामचंद्र आरोसकर*
*सिव्हिल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर*
*भटवाडी, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱Mob. No. – 9422434149*