You are currently viewing अजब बंगला

अजब बंगला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलिस अधिकारी वासुदेव खोपडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*अजब बंगला*

अरे माणसा माणसा
गर्व कशाचा रे तुला ?
उभ्या झाडावर डोले
मुक्या जीवाचा बंगला !!

वीटा, लोहा,रेती,माती
नाही तांत्रिकाचा सल्ला
खाली जल वर नभ
कसा निवारा सांधला !!

असे मार्जनाची सोय
आत झोपाळा टांगला
ऊन्ह, पाऊस रोधक
ऐसा महाल बांधला !!

त्रैलोकी रे अद्भुतम
ऊभा अजब बंगला
ईवल्याश्या रे चोचिन
तृणातृनातून सांधला !!

कर्ज मदत योजना
काही ठावं नसे तिला
ऐसी हुन्नरी सुग्रन
नांदेते स्वघरकुला !!

ईवल्या पाखराची कला
सांग येईल का तुला ?
बोल शहाण्या माणसा
गर्व कश्याचा रे तुला ?

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556

Advertisement

*स्थापत्य क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणारे भारतरत्न*

*सर मोक्षगुंडम विश्वेश्वर यांच्या जन्मदिना निमित्त विनम्र अभिवादन! 🙏*

*अभियंता दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!💐💐*

*शुभेच्छुक*

*श्री राजेंद्र रामचंद्र आंबेकर*
*गव्ह.रजि. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर*

*मु. वेत्ये , पोस्ट. मळगाव*
*ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*

*📱मो. न 9764185020 / 9405576707*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =