*काव्यनिनाद साहित्य मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ स्वाती गोखले यांची अप्रतिम काव्यरचना*
*करार*
अश्रुंच्या थेंबांचा अन् माझा करार ठरला होता
यावे त्यांनी कधीही,मी स्वीकार केला होता…
सुखात आनंदाश्रू अन् दु:खात ते दु:खाश्रू
सततची येत राहिले
कधी सांगूनही ते आले नाहीत
अन् कधी ते न सांगताही आले
बापुडे ते येतच राहिले…
मी स्वीकार केला होता…
जखमा व्हाव्या मला,अन् त्रास का त्यांना ?
अश्रुंच्या अन् माझ्या नात्यांचे गणित मलाच रुचेना…
हे स्नेहबंध कधी, गालावरून ओघळू लागले
असे कसे झाले, हे मलाच नाही कळले
मी स्वीकार केला होता…
कधीही यावे त्यांनी, अन् मी कुरवाळावे त्यांना
इतकेच मला वाटले,कसे समजावू मी अश्रुंना ?
अश्रुंच्या या दरबारी एक महान राजा होता
हुंदक्यांच्या मुलांचा बाप फक्त *आक्रोशच* ठरला होता
फक्त *आक्रोश* ठरला होता
असा आमचा *करार* ठरला होता…
मी *स्वीकार* केला होता…
सौ.स्वाती गोखले.
पुणे.