सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुडाळ आयोजित कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२१-२२ शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव तालुका कुडाळ येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा या शाळेच्या उच्च प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये या शाळेची विद्यार्थी कुमारी श्रावणी संगमेश्वर ज्योती हिचा द्वितीय क्रमांक आला. शाळेचे संस्थाध्यक्ष श्री शशिकांत अणावकर सर, संस्था सचिव मान. श्री आप्पासाहेब गावडे, सर्व संस्था संचालक, मुख्याध्यापक श्री एम जी कर्पे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे अभिनंदन केले.
कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा शाळेचे यश
- Post published:सप्टेंबर 13, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
मालवण कथामालेचे संस्कार परीक्षा आयोजन
श्री पंचम खेमराज महाविद्यालयांमध्ये राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांची पुण्यतिथी साजरी.
इंग्लंड दुसऱ्या डावात ३१६/६, भारतावर १२६ धावांची आघाडी
