You are currently viewing स्त्रिच्या संघर्षमय वेदनादायी जीवनाची वाटचाल

स्त्रिच्या संघर्षमय वेदनादायी जीवनाची वाटचाल

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ.ज्योती रामोड लिखीत संगीता बढे यांच्या जीवन प्रवासावरील अप्रतिम लेख*

*स्त्रिच्या संघर्षमय वेदनादायी जीवनाची वाटचाल*

” मनासारखे घडायला भाग्य लागते
आणि जे आहे ते मनासारखे आहे
समजायला ज्ञान लागतं ”

प्राचीन काळापासून स्त्री जीवनाकडे पहात आले की असे लक्षात येते. स्त्रीला मोठमोठी विशेषणे देऊन कधी नाते संबंध तर कधी समाज या बंधनात अडकवले जाते. काळ बदलत आहे वेळ बदलत आहे पण स्त्री संबंधीचा दृष्टिकोन समाजाचा खरोखरच बदलत आहे का ? हा गहन प्रश्न आजही प्रत्येक स्त्रीच्या समोर उभा आहे.  कधी सामाजिक, आर्थिक, भावनिक, नैतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, राजकीय, धार्मिक, मानसिक अशा वेगवेगळ्या बंधनरुपी जोखडात स्त्री अडकलेली असते. अशाच वेदनादायी प्रवासातून संगीता श्रीकांत बढे या गेलेल्या आहेत. प्रत्येक स्त्रीला जीवनात आलेल्या संकटातून, संघर्षातून, उभे राहण्याची क्षमता, ऊर्जा, प्रेरणा संगीता बढे यांच्या प्रवासातून मिळते.
आयुष्य खूप व्यवस्थित आणि आनंदात जात आहे या विचारात असतानाच अचानक अशी काही घटना घडते की आयुष्याचं रूपच पालटून जाते. ज्याप्रमाणे नदीला सागराचे रूप प्राप्त होण्यासाठी असंख्य पावसांच्या थेंबांची आवश्यकता असते अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात सुख आणि समाधान मिळण्यासाठी ओंजळीत असंख्य आनंदाच्या क्षणांची गुंफण करावी लागते. पण ज्याप्रमाणे निसर्गाचा एकच अनियंत्रीत आवेग सर्व नष्ट करतो अगदी त्याचप्रमाणे आयुष्यातील एखादी घटना ही आनंदाचे सर्व क्षण धुळीत मिळवते. असाच प्रसंग 2008 साली संगीता बढे यांच्या जीवनात घडला त्यांचे पती त्यांना सोडून गेले आणि जीवनाला वेगळाच अंधश्रद्धांचा रंग मिळाला. नैसर्गिकरित्याच स्त्रीही शृंगार करण्यासाठी आसुसलेली असते पण या प्रसंगामुळे विधवा झाल्यानंतर स्त्रीने काय काय घालू नये, हिरवा चुडा, हळद, कुंकू, जोडवे याचा त्याग करावा अशी अपेक्षा समाजाची आणि नातेवाईकांची आजही दिसून येते.
समाजाची हीच बंदिस्त विचारसरणी आपल्या कर्तृत्वातून आणि सृजनशील विचारातून मोडीत काढण्याचा त्याबरोबरच आपल्या मुलांचा आणि स्वतःच्या भविष्याचा विचार करत समाजातील विधवा स्त्रियांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न संगीता बढे यांनी केलेला आहे. त्याची प्रथम सुरुवात स्वतःपासून करत हळूहळू समाजापर्यंत पोहोचल्या. प्रथम हा बदल स्वीकारणे त्यांना स्वतःलाच खूप अवघड गेले पण हळूहळू त्या बदलत गेल्या. विधवा हा केवळ शब्द नाही तर घाव आहे असे मत त्या व्यक्त करतात. हरितालिकेचे व्रत करणे, वडाला फेर्‍या घालणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम जाहीररीत्या घेणे,हे करत असतांना त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. कोणत्याही विरोधाला न जुमानता समाज विचार सरणी बदलण्याच्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या.
” जिथे कमी तिथे आम्ही ” या नाऱ्या अंतर्गत विविध समाज प्रशंसनीय प्रबोधनात्मक उपक्रम संगीता बढे ज्यांनी घेतलेले आहेत त्यात विशेष रूपाने २०१४ मध्ये २० महीलांच्या बीसीच्या गटापासून एकत्रित हळदी कुंकवाच्या सोहळाचे आयोजन केले. राष्ट्रसेवा दलात राहून दरवषी ३ दिवसीय निवासी शिबीर घेवून त्यात व्यक्तीमत्त्व विकासासाठी गाणी , कलापथक , पथनाट्य, नाटक , एकांकिका , एकपात्री प्रयोग , वादन , गायन , इत्यादीच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांची जडण-घडण केली जाते.महिलांना त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देण्यासाठी अनेक उपक्रमातून प्रबोधन केले जाते. वर्तमानातील मुलींच्या समस्या समजून घेवून त्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न त्या करतात. पारिवारिक समस्या जाणून घेवून त्या आपापसात सोडवून त्यांना मदत करणे,मतीमंद शाळा, मुकबधीर विद्यालय , अनाथालय, वृद्धाश्रम यांना भेटी देवून गरजेच्या वस्तूंची वाटप करणे, महिलांमध्ये उद्योगाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना उद्योग करण्यास प्रोत्साहन देणे, त्यांना उत्पादन विक्रीस मदत करणे. महीलांमध्ये वाढता ताण-तणाव व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हा पुढील काळातील गंभीर विषय लक्षात घेऊन त्यांच्यातील डीप्रेशन दूर करून त्यांच्यात नवीन उत्साह निर्माण करणे. श्रमदानासाठी मदत करणे. रेन वॉटर हार्वेस्टिंग या कार्यात सहभाग,विविध ठिकाणांच्या शिबिरांना भेटी देऊन स्त्री जागृती करणे. १५० वी गांधी जयंतीनिमित्त निरनिराराळ्या ठीकाणी १५० वृक्ष लावायचा संकल्प व त्यापैकी ८०झाडांची लागवड त्यांनी केली आहे.युवावर्गा साठी नाटक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जाते.महीलांना अंधश्रद्धा विषयी जागृत करून त्यांना वास्तवतेत आणण्याचा प्रयत्न करणे.
एक स्त्री आयुष्याच्या संघर्षात्मक आणि वेदनादायक प्रवासातून समाजाला बदलण्याचा प्रयत्न करू शकते ती जिद्द बाळगू शकते या वृत्तीचे आदर्शवत उदाहरण म्हणजे संगीता बढे होय. आजही समाजात स्त्रिया जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांना सामोरे जाताना कधी कधी स्वतःला संपवण्याचा विचार करतात. त्या स्त्रियांनी संगीता बढे यांच्याकडे पाहून जगण्याची नवी दृष्टी आणि दिशा घेतली पाहिजे. प्रत्येक स्त्रीने जर स्वतःपासून बदल स्वीकारला तर तो समाजाला स्वीकारावा लागतो हे आपल्या कृतीतून संगीता बढे यांनी दाखवून दिले आहे. स्त्रीचे अस्तित्व, दुःख,वेदना, माया, प्रेम, भाव, या अनमोल रत्नांची गुंफण करत स्त्रीने समाजकार्य कसे करावे याची शिकवण त्यांच्या जीवन प्रवासातून मिळते.
चौकसबुद्धी, कुशाग्र नेतृत्व, संयम,सहनशीलता, आत्मविश्वास, प्रेरणा, जागृतता या सर्व गुणांची कास धरून स्वतःचे व समाजाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जर व्यक्ती मैदानात हरला तर त्याला जिंकता येते पण तो मनाने हारला तर त्याला जिंकणे कठीण असते. अशाच जीवनाच्या खेळात मनाने खंबीर राहून समाजासाठी कार्य करण्याचा वसा यांनी घेतला आहे. त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून अनेक स्त्रिया भविष्यात उभ्या राहतील आणि स्वतःचे अस्तित्व व समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक घडवण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे. फुलाचा सुगंध हा एकाच दिशेने पसरतो पण व्यक्तीच्या कार्याचा सुगंध हा चहू दिशेने पसरतो. याच उद्देशाने संगीता बढे यांच्या कार्याची ओळख समाजातील प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहचावी हीच आशा मी व्यक्त करते.
संगीता बढे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ईश्वर करो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असेच समाजकार्य व स्त्रीजागृती घडत जावो.
पिंपळाच्या रोपासारखे खडकावर
उगवता आले पाहिजे  निर्भिडपणे
निर्धाराच्या मार्गावर चालता आले
पाहिजे वादळात काय ते येतात
आणि जातात मातीत घट्ट पाय
रोवून उभं राहता आलं पाहिजे

डॉ. ज्योती रामोड
Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा