कणकवली
मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, ठाकरे सरकार तुझ्या राज्यात नाही न्याय रे अशा घोषणा देत, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आज भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडी च्या वतीने कणकवलीत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ठाकरे सरकार हाय हाय..,मंदिर खुली झालीच पाहिजेत अशा घोषणा देत ठाकरे सरकारवर टीका करणारी भजने गजरातून सादर करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी “झालो झालो झालोरे ..सरकारला कोरोना रे…,, तीन तिघाडा काम बिघडा..,उद्धवा तुझ्या मंदिरात न्याय नाहिरे बार केले खुले मात्र मंदिर नाही रे, ठाकरे ठाकरे तुझ्या गाडीला नाही चाकरे ,, चला गड्यानु चला गड्यानु मंदिर माझे खोलूया… या आणि अशा अनेक गजरातून महाविका आघाडी सरकारवर टीका करण्यात आली.
या वेळी आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा आध्यत्मिक समन्वय आघाडी कोकण विभाग सहसंघटक प्रकाश पारकर बुवा, जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, कणकवली मंडल अध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, कणकवली सभापती दिलीप तळेकर, महेश गुरव, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, सुचिता दळवी, स्वाती राणे, प्राची कर्पे, साक्षी वाळके, सोनू सावंत, संदीप मेस्त्री, मनोज रावराणे, बंड्या मांजरेकर, मिलिंद मेस्त्री, शिशिर परुळेकर, पप्पू पुजारे, सदा चव्हाण, सचिन पारधीये, स्वप्नील चिंदरकर, संदीप सावंत, समर्थ राणे समीर प्रभुगावकर, अवतारी कलाकार आप्पा दळवी, सुरेश गुरव, भास्कर सामंत आदी सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.