*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखीत अप्रतिम लेख*
*’गंप्या पोस्टमन’*
*संजय धनगव्हाळ*
*****************
गंप्या!हा वडगावबंधारा या गावचा पोस्टमन, गावाला वडगाव बंधारा हे नाव पडण्यामागे एक इतिहास आहे.म्हणजे गावात पुरातनकाळापासून एक भले मोठे वडाचे झाडं होते आणि त्या झाडाला लागुनच एक पाण्याने तुडुंब भरलेला बंधारा होता त्या बंधाऱ्यातील पाणी साऱ्या गावाला मिळायचे म्हणून त्या पाच हजार वस्तीच्या गावाचे नावं वडगावं बंधारा असे प्रचलित झाले.आणि अशा एतिहासिक गावात गंप्या हा एकुलताएक पोस्टमन होता.खरतर गंप्याच नाव गणपत असे होते पण या गावकऱ्यांनी गणपतचा पार् गंप्या करून टाकला म्हणून गणपत ऐवजी गंप्या पोस्टमन या नावाने गावकरी होकारत असे.
गंप्यांचे वडिल वडगाव बंधाऱ्याचे पोस्टमन होते.पण वारंवार तब्येत खराब होत असल्यामुळे वडिलांच्या जागेवर गंप्याला नौकरी मिळाली आणि काही दिवसानीच गंप्याचे वडिल स्वर्गवासी झालेतं त्या नंतर दोन वर्षंनी गंप्याच्या आईनेही या जगाचा निरोप घेतला त्यामुळे गंप्या पोरका झाला.आईवडील गेल्यामुळे एकुलताएक असलेल्या गंप्याला त्याची काळजी घेणारे कोणीच राहीले नाही म्हणून तो साऱ्या गावकऱ्यांना आपलचं समजायचा,गावकरीही गंप्याला आपल्याच कुटुंबातला एक सदस्य समजून त्याच्यावर प्रेम करायचे.आणि गंप्याल्याही कथी एकटेपणाची जाणीव झाली नाही.सारे गावकरी त्याची काळजी घ्यायचे सुख दुःखाला अडीअडचणीला मदत करायचे,सणसणावळीला गावातल्या कोण्या एका घरी गंप्याला हमखास जेवणाचे निमंत्रण असयचे तेव्हा असे लाडाकोडाच्या वातावरणात गंप्याला कधीच एकटेपणासारखे वाटतं नव्हते.तो सर्वंना आपलचं गणगोत समजायचा म्हणून गंप्याही त्यांच्यात मिळून मिसळून रहात असल्यामुळे गंप्याला कसलीच फिकीर नव्हती.
गंप्या तसा पदवीधर पण अगदी साधाभोळा सरळ एकमार्गी,कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही सांगितल्या बरोबर सर्वांच्यां मदतीला हजरं कोणी काहीही काम सांगितले की नकार नसायचां होकार देवून गंप्या काम फत्ते केल्याशिवाय गावात परतायचा नाहीचं.म्हणून साऱ्या गावकऱ्यांचा गंप्यावर लई जीव होता. वडगावबंधाऱ्याच्या जवळपासची गावातील माणसही गंप्याची चांगलीच परिचित होती. सर्वांना तो ओळखायचा त्या गावातील प्रत्येक घराघरातील खडानखडा माहिती गंप्याची तोंडपाठ होती.कुणाला मुलं किती, मुली किती,किती जावाई, कुणाची मुलगी कुठे दिली,कुणाची सुनं कोणत्या गावाची,कुणाची मुलगी लग्नाची आहे, कुणाचा मुलगा कुठे नौकरी करतो,कोणा जवळ शेतीबाडी,जमीन जंमला,घरदार प्रॉपर्टी किती.एव्हढचं नाहितर कुणाचा टाका कुणाशी भिडला आहे, कुणाची भानगड कुणाशी आहे आणखीन जरा खाजगीत सांगायच झालच तरं कुणाच्या घरात काय चाल्लय,कोण बायकोच्या तब्यात आहे,बायकांच्या काय गप्पा चालतात
बापरै…बाप अशा कितीतरी बारीकसारीक गप्पागोष्टीकडे गंप्याची कानपूर लाईन जोडलेली होती.म्हणून सारे उनाड पोरं पंचायतीच्या चावडीवर रात्री गोळा व्हायचे आणि गंप्या कडून साऱ्या गप्पा एकण्यास उत्सुक असायचे.गंप्याही मस्तपैकी तिखटमीठ लावून चविने सांगायचा. सारे पोरं कसे कान टवकारून बिड्यांचे झुरके ओढून, पाना गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून तासंतास ग्रामपंचायतीच्या ओट्यावर गप्पांचा फडं रंगायचा.
गंप्याचं समाजकार्यही खूप मोठं होतं टपाल वाटण्याबरोबर लग्न जुळवण्यातही गंप्या माहिर होता बरीच लग्न त्याने जुळवली होती एखाद्या घरात लग्नकरण्यासारखी मुलगी दिसली म्हणजे न लाजता,न घाबरता तो मुलीच्या बापाला तिच्या लग्नाबद्दल विचारून टाकायच्या,आमक्या गावात आमक्याचा पोरगा लग्नाचा आहे एकटा पोरगा, बागायत शेती,इस्टेट भरपूर, कशालाच काही कमी नाही,घरात नौकरचाकर पोरीला कसलाच त्रास नसणार तुम्ही सांगाल तर मुलीच्या वडिलांकडे निरोप पाठवतो.मुलीच्या वडिलांचा होकार मिळतात गंप्याचे पाय मुलाच्या घराकडे वळायचे.आमक्या आमक्या गावाला आमक्याची पोरगी आहे. दिसायला सुदंर देखणी एकुलती एक घराला घरपण देणारी नावं ठेवायला कुठेचं जागा नाही तुम्ही म्हणतं असाल तर योग घडवून आणतो.मुलाच्या वडिलांचा होकार मिळाला की गंप्याचा मोर्चा मुलीच्या घरी. दोघांची पसंती झाल्यावर धुमधडाक्यात लग्नाचा बँड वाजायचा.लग्नाचा योग गंप्याने घडवून आणल्यामुळे लग्नात गंप्याचा थाट तर विचारायलाचं नको गंप्या तर दोघीकडचा पाहुणा! काय त्याचा संन्मान काय त्याचा सत्कार,काय त्याचा रूबाब विचारायलाच नको एकदम ओक्केमधेच
मुला मुलीच्या मंडळी कडून गंप्याचं खूपं कौतुक व्हायचं मग काय त्याला हारतुरे, जेवायच्या वेळी पंगतीत बसायला पाट ताटाभोवती रांगळी विशेष पाहूणा म्हणून दोघी मंडळी कडून एकशेएक्कावन्न रूपये आणि नारळ.त्या दिवशी गंप्याला सर्वांनकडून मानपान सन्मानचं मिळायचा.
सरकारी नौकरी चांगला पगार,पाच एकर जमीन त्यातून मिळणारे उत्पन्न शिवाय स्वतःचे घर गंप्याला कसलीच काही कमी नव्हती सर्वाकाही चांगल असताना मात्र त्याचं लग्न काही जमत नव्हते अनेकांची लग्न त्याने जुळवलीत पण त्याच्या लग्नासाठी कोणीच पुढाकार घेईना गंप्या दिसायलाही छानं होता तरीही त्याचा लग्नयोग कोणाच्या घरच्या खुंटीला बांधला होता काही कळेना.खरतर त्याच कोणी बघणारे असते तर कधीच लग्न झाले असते पण लग्न गाठी या वरुनच बांधुन येतात तेव्हा असेल आपलीही होणारी बायको कुठेतरी! योग आला की स्वतःहून येईल ती असं म्हणून तो काही वाईट वाटून घेत नसे.सायकलीची घंटी वाजली म्हणजे गंप्याच्या अवतीभवती सार गावं जमायचं मग प्रत्येकाला ज्याचे त्याचे टपाल देवून सायकलीची घंटी वाजवत पुढच्या गावाला रवाना व्हायचं.रोजच्या दैनंदिन सरकारी कामाला गंप्या मात्र प्रमाणिक होतां.एकदा अचानक गावच्या सरपंचांनी गंप्याल्या बोलवने पाठवले अर्थात गावात कोणतेही राजकीय, सामाजिक,धार्मिक कार्यक्रम असले की त्याचे नियोजन हमखास गंप्याकडेच असायचे वडगावबंधाऱ्याचे सरपंच आबासाहेब देशमुख याच्यामुळे गावात सर्वाकाही सुखसुविधा झाल्यात जिल्यातील ‘वडगावबंधारा’हे गावं एकनंबराला होते शिवाय गंप्या आबासाहेबांचा भरोशाचा माणूस म्हटल्यावर आबांच गंप्यावर विषेश प्रेम आणि गंप्याही आंबाचा शब्द खाली पडू देत नव्हता.म्हणून कोणतेही कार्यक्रम असुदे गंप्याशिवाय त्याचे नियोजन शक्य नसायचे. कार्यक्रमाचे नियोजनात अथवा पाहूण्यांच्या व्यवस्थेत गंप्याचे अतिशय काळजीपूर्वक लक्ष असायचे. . सायकलवर टांग टाकली आणि इकडे तिकडे न बघतां सरळमार्गीने गंप्या टपाल वाटायला निघाला असता अचानक पाठीमागून गोडं मंजुळा आवाज एकू आला आवाजाच्या दिशेने गंप्याने कान वळवलीत आणि गंप्या आं वासून एकसारखे बघतंच राहिला,आभाळ कोसल्या सारखे झाले, त्याला विश्वास बसतं नव्हता आपण काय बघतोय,खरचं बघतोय की स्वप्न बघतोय असचं झाले समोर साक्षात सुंदर देखणी लावण्यवती मुलगी गावात पहिल्यांदाच आलेली बघीतल्यावर गंप्याला काहीच काही सुचेना ‘सरपंच कुठे असतात हो? तिच्या या गोडं आवाजाने गंप्या भानावर येताच.’आपण काही म्हणालात का’?
‘मी म्हटले सरपंच कुठे राहतात!
‘तुम्ही म्हणाल तरं मी दाखवतो त्यांच घरं!
नाही म्हणजे कसं आहे की सरपंच साहेबांच्या मर्जीतला मी खास माणूस,’गणपत’ माझं नावं पण गावकरी गंप्या म्हणून बोलवतातं
आपल नावं?
नाही म्हणजे…..!
‘सविता’….
‘सविता!…व्वा छान नाव आहे’…तर त्याच काय आहे ‘सविता मॅडम’ आमच्या गावात आपण पहिल्यांदाच आलात, आपल्यासारखे नक्षत्र आमच्या गावातं अवतरले म्हटल्यावर कोणाची द्रुष्ट लागायला नको म्हणून मिचं तुम्हाला सरपंच साहेबांच घर दाखवतो’,आता सविता मॅडम आणखी पुढे काही बोलण्याच्या आत पुन्हां गंप्या…’बरं कसं येण केलतं आमच्या गावात!’
‘या गावात नव्याने सुरू झालेल्या शाळेत सरपंच साहेबांच्या शिफारशीनी मी शिक्षिका म्हणून या गावात आले.तेव्हा प्रथम साहेबांची भेट घेतली की पुढच्या कामाला मार्ग मोकळा यासाठीच त्यांच्या घरी जायचे म्हणते मी’,
‘व्वा का नाही!म्हणजे चारही वर्गाला तुम्हीच शिकवणार तर!
हो…!
आणि सरपंचाच घर येईपर्यंत त्या सविता मॅडमांना गंप्याने आपल्या आयुष्याचा संपूर्ण लेखाजोखा सांगुन टाकला,बाई काहीच न बोलता गंप्याची बडबड ऐकता ऐकता सरपंच साहेबांच्या घरी पोहचला साहेबांची भेट झाल्यावर साहेबांनी गंप्यावर हुकूम सोडला.’हे बघं गंप्या या आपल्या गावच्या शिक्षिका आहेत यांना कुठलीच अडचण यायला नको,काय लागते काय नाही ते सार तू बघायचं, वरच्या गावातली खोली रिकामी आहे ती त्यांना दाखवं त्या खोलीची साफसफाई करं काय सारसामान लागतो ते आणून दे त्यानंतर शाळा दाखवं आणि काही महत्वाची कागदपत्रे पोहचवायची व आणायची असली तर ती जबादारी तुझी समजलका’
‘समजलना आबासाहेब सगळ करतो की मी तुमची काम करतो म्हटल्यावर त्यांची का नाही करणार.आता बाईंची जबाबदारी माझ्यावरचं काय…!’
असं म्हणून गंप्याने त्या सविता मॅडमांना सरपंचांनी सांगीतलेल्या खोलीवर नेले खोलीची साफसफाई केली.त्या नको नको म्हणत असतांनाही गंप्याने सर्व कामे केलीतं स्वतःच्या घरचा पलंग,पंखा,गादी पाण्याची बादली रोज वापरण्यासाठी काही भांडीकुंडी आणून दिलीत आणि त्या दिवसापासुन गंप्याचीनी् मॅडमांची रोजच्या भेटीगाठी व नजरानजरीचा सिलसिला सुरू झाला.
गावात मॅडम आल्यापासून गंप्याचं ग्रामपंचायतीच्या चावडीवर,मित्रांसोबत गप्पा झोडायला येण्याचे बंद झाले शिवाय पहिल्यापेक्षा पाचपटीने त्याची राहणीमान सुधारली अंगावर चांगले कपडे दिसायला लागल्यामुळे मित्र सवंगडी गावकरी अचंबित झाले.वागण्यात बोलण्यातही खूपच बदल झाला.ऑफिस कामाशिवाय ईतर रिकामी कामेही गंप्याने बंद केलीत.रोजच्या येण्याजाण्याने अवघ्या सहा महिन्यातच गंप्याची व सविता मॅडमांशी चांगलीच ओळख झाली.मॅडमांनी सांगितलेली शाळेची कामे गंप्या बिनचूक करायचा त्यामुळे गंप्याशिवाय मॅडमांचे कामे अडून जायची व गंप्याची सवय झाल्यामुळे सविता मॅडमांनाही काही करमायचे नाही.वर्षभरात दोघही हळूहळू एकमेकांना खूपच चांगले ओळखायला लागलेत. गंप्याही मॅडमांच्या सहवासाचा आनंद,आणि गुलाबी स्वपनात रंगून जायचा.जणू तो तिच्या प्रेमात गुरफटला पण सांगुशकत नव्हता प्रेम काय असते हे गंप्याला हळूहळू कळायला लागले कोणीतरी आपल्याला भेटल्याची जाणीव गंप्याला होवू लागली पण मनातल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे गंप्याला काही कळेना. गंप्याने अनेकांच्या चिठ्ठ्या ईकडच्या तिकडे केल्यात पण स्वतःने मात्र कुणासाठी चिठ्ठी लिहली नव्हती परंतू मॅडम आल्यापासून गंप्या पुरता त्यांच्या प्रेमात बुडाला होता म्हणून आपल्या मनातल्या भावना चिठ्ठीत लिहून महत्वाचे पाकीट आल्याचे सांगुन गंप्याने त्यांच्या हातात स्वतःच प्रेमपत्र दिले.पत्र वाचताना सविता मॅडमांचा बदलेला चेहरा पाहून गंप्याची चांगलीच टरकायला लागली मॅडमांचा चेहरा लालेलाल तर गंप्याचा चेहरा काळा पिवळा झाला,गंप्या घाबरायला लागला पत्र वाचून मॅडम ताडकन उठल्या पुढेकाही बोलण्याच्या आत गंप्याने त्यांचे पाय धरून क्षमा मागितली.
‘मॅडम मला क्षमा करा मी चुकलो मी अस करायला नको होतं मी यापुढे असे कधीच करणार नाही आपण जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे एकदा क्षमा करा पण कोणाला सांगु नका’
गंप्याला जेकाही सांगायचं होत ते एका दमात सांगुन टाकले तसे सरपंचांनीही गंप्याची सर्व कहाणी सविता मॅडमांना सांगीतल्याने त्यांच्याही मनात उठलेला भावनांचा कल्लोळ मोकळा करायला संधी मिळाली. मग काय सविता मॅडमने गंप्याचे दोघी हात हातात घेवून त्याच्या जवळ आपल्या भावना व्यक्त केल्यात क्षणभर त्याला विश्वास बसत नव्हता जे एकतोय ते खरच की स्वप्न त्याला काही कळेना
पण ते खरचं होतं.ज्या दिवशी सरपंचांनी तुमच्याबद्दल सांगितले त्याच दिवशी तुम्ही माझ्या मनात घर केले पण कसं सांगावे काही कळेना,माझेही आई बाबा देवा घरी गेलेत,त्या नंतर मामांनी माझा सांभाळ केला त्यांच्याच प्रयत्नाने मला नौकरी मिळाली आता मामाही राहीले नाहीत मामी तिच्या मुलाकडे मुंबईला रहायला गेली तेव्हा तुमच्यासारख्या गुणी मुलाचा आधार जर मला जन्मभर मिळणार असेल तर लग्नाच्या बेडीत अडकायला माझी काहीच हरकत नाही फक्त तुमचा होकार हवायं’
सविता मॅडमांचा होकार असल्यावर गंप्या नकार कसला देतोय.मग काय गंप्याच्या लग्नाची वार्ता होतोहात साऱ्या गावात पसरली.
वडगावबंधाऱ्यासकट आजूबाजूच्या सर्व गावकऱ्यांनी तसचे अधिकाऱ्यांनी गंप्याच्या लग्नाला हजेरी लावली सरपंचच्या मदतीने गंप्याच लग्न धुमधडाक्यात झाले. कन्यादान सरपंचांनीच केले.गंप्याच लग्न म्हणजे आपलं घरचचं लग्न आहे म्हणून गंप्याच्या जिवाभावाच्या मिंत्रानीसुध्दा गंप्याच्या लग्नात जबाबदारीने राबलेत.गंप्याचं लग्न सर्व गावकऱ्यांसाठी आदर्श विवाह ठरला यावेळी गंप्याला त्याच्या आईवडीलांची आठवण झाली ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता.गंप्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंप्याची पोस्टमास्तर म्हणून बढती केले.
बायकोच्या पायगुणांमुळे पोस्टमनचे पोस्टमास्तर म्हणून गंप्याचे प्रमोशन झाले हे गंप्याला मिळालेली खूप मोठी लग्नभेटं होती.एकदाचं गंप्यांच लग्न झालनी् गावकऱ्यांच्या जीवात जीव आला. मग काय आता गंप्या आणि त्याची बायको दोघेही रोज मोटारसायकलीने ऑफिसला र्भुर्रकनी जाऊ लागले.
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*