You are currently viewing सर्जन आणि विसर्जन
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सर्जन आणि विसर्जन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री स्मिता गोरंटीवार लिखीत अप्रतिम लेख*

*सर्जन आणि विसर्जन*

सर्जनाचे कार्य जिथे कुठे चालते ते आदराचे स्थान असते. हे मग शाळा, असो की कला क्षेत्र.. सर्व जागा, फल देणाऱ्या इच्छित स्थळापर्यंत नेणाऱ्या, व्यक्तिगत उत्कर्ष साधणाऱ्या ठरतात. आयुष्याला वळण लागते ते याच कारणाने, आणि हेच स्रोत प्रत्येकातील क्षमता ओळखून त्यानुसार विकास घडवून आणतात. ज्यांच्यावर या विधायक कार्याची मोहर उमटली नसेल त्यांच्या जीवनाची मग विसर्जनाकडे अर्थात कारावासाकडेच वर्णी लागली म्हणून समजाच !!
देहाचे विसर्जन झाले तरी आत्मा अमर आहे प्राणप्रतिष्ठा केलेली देवी देवतांची मूर्ती असो
की नरदेह… अस्थी, राख, विसर्जन केल्यानंतर इतर निकटवर्तीयांच्या मनात त्याबद्दल प्रेम, असुया निर्माण होते, चांगले वाईट भाव जागृत होतात आणि … जसे अनुभव आले असेल त्या व्यक्तीबद्दल तसे प्रदर्शित होतात, शब्दातून वा कृतीतून!!आठवणीचं पर्व उजळून निघतं!!
विसर्जन करायला हवेत एकमेकांबद्दलचे हेवेदावे , द्वेष, तिरस्कार, अढी, आणि दबा धरून बसलेले षडरिपू ..
स्व ला ओळखण्यासाठी आपल्या आतल्या मनाशी आत्ममग्न व्हायला हवं, त्यासाठी मात्र मनासोबत संवाद साधायला हवा, तेव्हाच आपल्यातील गुण दोषाचे प्रकटीकरण होईल. आणि ठरवले तर आणि तरच ते विसर्जित करण्याकडे कल जाईल… ही अवघड प्रक्रिया तर आहेच पण असाध्य नक्कीच नाही, संपूर्ण हयात कमी पडेल, कधी कधी तर ध्येयापासून भरकटून पण जाऊ शकतो, माणूस शेवटी माणूसच आहे न.. व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं.. बुद्धीची देण लाभली मानवाला तर काही विशेष असे प्रदर्शन समाजात व्हायलाच पाहिजे… नित्य नवे सृजन सोहळे व्हायला पाहिजेत . हे जीवन यज्ञ आहे त्यात कुठल्या समिधा टाकायच्या हे ज्याचं त्यांने ठरवायचं असतं किंवा नकळत ते घडून येत असतं असं म्हणा हवं तर..
.
ओम आवाहनम न जानामि न जानामि विसर्जन असे म्हणून क्षमा प्रार्थना करायची बस्स!! हे,हे प्रत्येकाने करायलाच हवं!
श्वास लाभल्यापासून सुरू होतो सर्जनशील प्रवास आणि
जातो एक दिवस सोडून या माझ्या माझ्या म्हणत असलेल्या कुडीतून, आणि उरतं फक्त कलेवर आत्मा परदेहात कदाचित प्रवेश करत असेल आणि मग निष्प्राण,कळाहीन,अचेत देह विसर्जनाशिवाय पर्याय उरत नाही..निर्माल्याप्रमाणे
*देह बदलुनी वावरण्याचा आत्म्याला तर सराव असतो*
*भाड्याचे घर खाली करणे नियम कदाचित पाळत आहे’*

स्मिता गोरंटीवार वणी
9850079959

Advertisement

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

*Web link*
https://sanwadmedia.com/60248/

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =