You are currently viewing राजरोसपणे चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करा – मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर

राजरोसपणे चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करा – मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर

मालवण तालुका मनसे तर्फे पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर

मालवण
राजरोसपणे चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे आज पोलिस निरीक्षक, मालवण पोलिस ठाणे यांना देण्यात आले.
आज मालवण शहरासोबतच मालवण तालुक्यात, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत दारु धंदे, मटका, वेश्याव्यवसाय, अनधिकृत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालु आहे. मात्र या अनधिकृत धंद्यांवर मालवण पोलिसांकडुन धाड टाकलेली दिसुन येत नाही. आधीच कोरोना काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बेरोजगारी वाढलेली आहे. तरुणांमध्ये निराशा आहे. आज अनेक भागात गोवा बनावटीची दारू विक्री व अनधिकृत वाहतूक होत आहे. यामुळे तरुण वर्ग नाहक व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. कुटुंबे उध्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्या पोलिस स्थानकाच्या अखत्यारीत येत असणार्‍या अनधिकृत दारु धंदे, गोवा दारू, मटका, वेश्याव्यवसाय, अनधिकृत गुटखा विक्री त्वरित बंद करण्यात यावेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास या निवेदनाद्वारे कळवु इच्छीतो, वरील दिलेले सर्व अनधिकृत धंदे बंद करण्यात यावेत, अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागेल. उद्भवणार्‍या परिस्थितीस आपणच जबाबदार असाल. असे निवेदन मालवण तालुका मनसेतर्फे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिले.
यावेळी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, महिला शहरअध्यक्षा भारती वाघ, महिला उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, उदय गावडे, नंदकिशोर गावडे, उपशहरअध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे उपतालुकाध्यक्ष संकेत वाईरकर, मनविसे शहरअध्यक्ष साईराज चव्हाण, विजय गावडे, दिनेश कदम, सचिन गावडे, सुशील चव्हाण, दत्तराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, रेकी फर्नांडिस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा