डॉ. दिनेश नागवेकर यांनी घेतली हरकत.
महाराष्ट्रातून हद्दपार होणाऱ्या नियमावलीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला आधार डॉ. दिनेश नागवेकर यांनी हरकत घेतली आहे.महाराष्ट्र राज्यातील बृहन्मुंबई वगळता सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती, विशेष नियोजन प्राधिकरणे, नवनगर विकास प्राधिकारण महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या नियमावली ऐवजी एकत्रिकृत सर्व समावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करणेबाबत ८ मार्च २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने सूचना काढली आहे.
सदर नियमावलीत आणखी लोकहिताच्या सुधारणा करण्यात आलेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला ही नियमावली लवकरच लागू होईल. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ ची प्रादेशिक योजनेबाबतची नियमावली महाराष्ट्रात अस्तित्वात रहाणार नाही, असे असताना महाराष्ट्रात हद्दपार होणाऱ्या या नियमावलीचा आधार घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याची सूचना महाराष्ट्र शासनाने ११ फेब्रु.२०२० रोजी काढली असून या फेरबदलाचा इस्टिट्युट ऑफ इंजिनिअर, कौन्सील ऑफ इंजिनिअर्सचे सदस्य तसेच इंस्टिटयुट ऑफइंडस्ट्रियल इंजिनिअर्स या संस्थेचे वरिष्ठ आजीवन सदस्य डॉ.दिनेश नागवेकर यांनी मुदतीत हरकत घेतली आहे.