पण खेळाडूंच्या मुलाखतीने आठवणींना उजाळा देणार.
शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने गेली ५०वर्ष सातत्याने होणारी कबड्डी स्पर्धा यावर्षी कोरोना विषाणू संसर्गजन्य विकाराच्या महाभयंकर विकारामुळे रद्द करण्यात आली आहे.
मुंबईतील कबड्डी हंगामाची सुरुवात या स्पर्धेपासूनच सुरू होतो अशी या स्पर्धेची ओळख आहे. गेली कित्येक वर्षे ही परंपरा कायम होती ती कोरोनामुळे या वर्षी खंडित झाली.
कोरोनामुळे जरी यंदा ही स्पर्धा होऊ शकत नाही तरी ती उणीव एका वेगळ्या पद्धतीने भरून काढण्याचा मानस या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानिमित्ताने १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार यांच्या ऑन-लाईन मुलाखती घेण्यात येतील. त्या फेसबुक व यु-ट्युबच्या माध्यमातून कबड्डीप्रेमीपर्यंत पोहचवून या स्पर्धेतील जुन्या आठवणीना उजाळा देण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात येईल.